साक्री तालुक्यातील पिंपळनेर जवळ बल्हाने गावात कोरोनाचा एक रुग्ण आढळला

Featured धुळे
Share This:

पिंपळनेर (तेज समाचार प्रतिनिधी ):  पिंपळनेर येथून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या बल्हाणे या गावात सोमवारी ६५ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. त्यामुळे बल्हाणे गावसह परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. येथे राहणाऱ्या एका ६५ वर्षीय वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. दरम्यान पॉझिटिव आढळलेल्या ६५ वर्षीय वृद्ध गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होता. त्यातच त्याला आधीपासून दम्याचा व  खोकल्याचा त्रास होता. त्रास अधिक होत असल्याने संबंधित वृद्ध हा स्थानिक डॉक्टरकडे उपचारासाठी गेला असता त्याच्यावर  खाजगी  डॉक्टरने उपचार न करता पिंपळनेर येथे पाठविले तर पिंपळनेर येथील एका नामांकित खासगी दवाखान्यात रविवारी  सकाळी  अकरा वाजेच्या सुमारास  उपचार घेतल्याची माहिती  समोर आली आहे. शनिवारी संबंधित वृद्ध हा जास्त त्रास होत असल्यानेेे पिंपळनेर येथे उपचारासाठी आला होता मात्र पिंपळनेरच्या खाजगी डॉक्टरने त्यास धुळे येथे पाठविले दरम्यान धुळे तपासणीनंतर संबंधित रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवचंद्र सांगळे, तालुका आरोग्य अधिकारी आशुतोष साळुंंखे, पोलीस उपविभागीय अधिकारी श्रीकांत घुमरे, गटविकास अधिकारी जी टी सूर्यवंशी,पिंपळनेेेरचे अपर तहसीलदार विनायक थविल,
पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर,पोलीस उपनिरीक्षक भूषण हांडोरे, सरपंच मंगलबाई माळी, जितेंद्र बिरारीस,ग्रामसेवक विलास जाधव यांसह अंगणवाडी कार्यकर्त्या,आशा कार्यकर्त्या,ड्युटी लावलेले प्राथमिक शिक्षक,आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी हे गावात तळ ठोकून होते.
११ मे रोजी संबंधित

वृध्दाच्या घरी त्यांची मुलगी, जावई, व नातवंडे हे मुंबई येथून आले होते.त्यांनी गावाजवळील सुकापुर प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणीही केली होती व  घराबाहेर न जाण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला होता. त्यातच पॉझिटिव्ह आढळलेल्या वृद्धाचे गावात किराणा दुकान आहे. तर चार पाच दिवसापासून ते किराणा दुकानात बसत नसल्याची माहिती यावेळी समोर आली आहे. तर संबंधित वृद्धाचा मुलगा हा पिंपळनेर येथील एका घरपोच शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या दुकानावर कामाला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेचा ताण वाढला असून पॉझिटिव्ह आढळलेला रुग्णाच्या संपर्कामध्ये अजून किती लोक आले हे आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणाअंती स्पष्ट होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
प्रशासनाने पॉझिटिव्ह आढळलेल्या वृद्धाने
पिंपळनेरच्या ज्या खाजगी रुग्णालयात उपचार घेतले होते त्या  रुग्णालय प्रशासनाला १४ दिवस संपूर्ण क्वारंटाईन राहण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत तर दवाखाना पूर्णपणे बंद ठेवण्यात आला असून.तात्काळ निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. संपूर्ण काळजी रुग्णालय प्रशासन घेत आहे घटना घडल्यानंतर बल्हाणे गावात संपूर्ण शांतता दिसून आली असून प्रमुख पाच रस्त्यांवर बॅरिकेट्स लावण्यात आले असून पिंपळनेर पोलिस या ठिकाणी तैनात आहेत.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *