हायमास्ट लॅम्प पोलमध्ये करंट उतरल्याने राजस्थानी बोकड आणि एक बकरी जागीच ठार

Featured जळगाव
Share This:

हायमास्ट लॅम्प पोलमध्ये करंट उतरल्याने राजस्थानी बोकड आणि एक बकरी जागीच ठार.

30 हजाराचे नुकसान यावल पोलीस स्टेशनला नोंद.

जबाबदार नगरपालिका की विज वितरण कंपनी.

यावल (सुरेश पाटील): दि.16 रोजी संध्याकाळी यावल शहरात पाऊस सदृश्य वादळ निर्माण झाले होते यानंतर संध्याकाळी19:30 वाजेच्या सुमारास यावल जंगलातून बकऱ्या चारुन घरी येत असताना यावल शहरातील मयत व्यक्तींना ज्या ठिकाणी विसावा दिला जातो त्या ठिकाणच्या चौकात हायमस्ट लॅम्प पोल जवळून जात असताना एक राजस्थानी बोकड लाल सोनेरी ठिपके असलेला,तसेच एक गावठी पांढरी बकरी सोनेरी ठिपके असलेली दोघांची किंमत अंदाजे30हजार रुपये यांना हायमस्ट लॅम्प पोलचा इलेक्ट्रिक शॉक लागून जागीच मरण पावल्या.याबाबत राहुल माधवराव निंबाळकर वय 32 धंदा शेती मजुरी राहणार शिवाजीनगर यावल यांनी यावल पोस्टेला खबर दिल्यावरून यावल पोस्टेला या घटनेबाबत दि.16मे2021रोजी नोंद करण्यात आली आहे.इलेक्ट्रिक शॉकमुळे जागीच ठार झालेल्या बोकडाचे आणि बकरीचे शवविच्छेदन पशुवैद्यकीय अधिकारी यांनी केले.
हायमस्ट इलेक्ट्रिक पोलची जबाबदारी आणि देखभाल यावल नगरपालिकेची आहे की म.रा.वी. वितरण कंपनीची आहे याबाबत बकरी मालकाने दोघांकडे विचारणा केली असता दोघं विभाग एकमेकाकडे बोट दाखवित असल्याने बकरी मालक मात्र संभ्रमात पडला आहे.या ठिकाणी एखाद्यावेळेस एखाद्या व्यक्तीस,महिलेस किंवा लहान मुलास इलेक्ट्रिक शॉक लागून अप्रिय घटना घडली असती तर याला जबाबदार कोण राहिले असते आणि यापुढे सुद्धा जबाबदार कोण राहील याबाबत संबंधितांनी नागरिकांच्या माहितीसाठी तसे जाहीर करावे,किंवा इलेक्ट्रिक पोल वरून कोणाला शॉक लागणार नाही याबाबत कार्यवाही करावी अन्यथा एखाद्या घटनेत संतप्त जमाव दोन्ही कार्यालयावर जमाव जमून अप्रिय घटना घडू शकते याची नोंद संबंधित सर्व विभागाने, अधिकाऱ्यांनी घ्यावी असे यावल शहरात बोलले जात आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *