मास्क घातला नाही तर 10 हजार रूपये दंड

Featured देश
Share This:

तिरूवनंतपुरम (तेज समाचार डेस्क): कोरोनाचा विळखा वाढत असताना केरळ राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर केला नाही तर 10 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार असल्याचं केरळ राज्य सरकारने जाहीर केलं आहे.पुढील एक वर्ष म्हणजे जुलै 2021 पर्यंत केरळ सरकारने हा निर्णय लागू केला आहे. त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंग पाळणं देखील अनिवार्य असणार आहे. प्रत्येक ठिकाणी 6 फूट अंतर सोशल डिस्टन्सिंग ठेवावं लागणार असल्याचं केरळ सरकारने सांगितलं आहे.

व्यावसायिक आस्थापनांमध्ये तसंच दुकानांमध्ये एकावेळी 20 पेक्षा अधिक ग्राहक जमा होऊ देऊ नये. त्याबरोबर सर्व ग्राहकांना 6 फूट सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे. तसंच सार्वजनिक ठिकाणी, रस्ते किंवा फुटपाथवर थुंकण्यावर बंदी घालण्यात आली आहे.लग्न आणि अंत्ययात्रेचे नियम सुद्धा शासनाने घालून दिलेले आहे. लग्न समारंभात 50 लोकं सहभागी होऊ शकतात. त्यासोबत अंतयात्रेत फक्त 20 लोकं सहभागी होऊ शकतात.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *