
सुरत-सोलापूर महामार्गावर तरवाडे गावात कापसाच्या ट्रकला आग लागून कापसाच्या गाठणी जळून 5 लाखाचे नुकसान झाले.
सुरत-सोलापूर महामार्गावर तरवाडे गावात कापसाच्या ट्रकला आग लागून कापसाच्या गाठणी जळून 5 लाखाचे नुकसान झाले.
धुळे (तेजसमाचार प्रथिनिधी): सविस्तर माहिती की, तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर पहाटेच्या वेळी घडलेली घटना श्री लक्ष्मी साड श्रीनिवासा मोतीनगर खम्मम तेलंगाना येथून अशोक लेलँड क्रमांक टी एस 29/टी 9788 ट्रक मध्ये 239 क्विंटल पोत्यामध्ये भरलेला कापूस चालक बनोथु व्यकंना देवला बंजारा रा.तेलंगाना स्वत: गाडी चालवत नेत असताना सुरत – सोलापूर महामार्गावरील चाळीसगाव रोड मार्गाने पहाटेच्या वेळी धुळे शिरूड मार्गाने तरवाडे गावाच्या स्पीड ब्रेकर कडे जात असताना ट्रक मधील पोत्यातील कापसाला अचानकपणे आग लागल्याने ते लक्षात आल्याने गाडी महामार्गाजवळ बाजूला उभी केली परंतु गाडीतील कापसाने पेट घेतल्याने मोठे नुकसान झाले. यात अंदाजे पाच लाखांचा कापूस जळून खाक झाला याप्रकरणी ट्रक चालक यांनी तालुका पोलीस स्टेशन गाठत लेखी तक्रार नोंद केलेली आहे. तालुका पोलिस ठाण्यात चालकाने दिलेल्या तक्रारीनुसार पाच लाखाचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. अग्नि उपद्रव नोंद करण्यात आली. पुढील तपास असई गवळी करत आहे.