ग्रामीण भागातील अवैध धंद्याबाबत यावल पोलिसांना बदनाम करण्याचे षडयंत्र?

Featured जळगाव
Share This:

ग्रामीण भागातील अवैध धंद्याबाबत यावल पोलिसांना बदनाम करण्याचे षडयंत्र?

महाविकास आघाडीतील तीन तिघाडा आणि काम बिघाडा तालुक्यात चर्चेचा विषय?

यावल (सुरेश पाटील): महा विकास आघाडीतील एका कार्यकर्त्याने आपल्या गावात सट्टा पत्ता सुरू असल्याबाबतचे निवेदन यावल पोलिसात दिल्याने राज्यातील महाविकास आघाडी ही शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस, आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मिळून झालेली असल्याने त्यांच्या सत्ताधारी पक्षातील एका कार्यकर्त्याला निवेदन द्यावे लागते. म्हणजे सत्ताधारी पक्षाला घरचा आहेर दिला जात आहे का? याबाबत संपूर्ण यावल तालुक्यातील राजकारणात अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून तालुक्यात इतर अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित असताना,चुकीच्या पद्धतीने कामे होत आहे, तालुक्यात पाहिजे त्या ठिकाणी तसेच प्रतिनिधीच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने अनधिकृत दुकाने बांधकामे करण्यात येत आहे त्याकडे शासनाचे तथा महा विकास आघाडीचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने महाविकास आघाडी म्हणजे ‘तीन तिघाडा’ आणि ‘काम बिघाडा’असे झाले आहे का?पोलिसांवर गंभीर आरोप करणे यामागे मोठे राजकीय षडयंत्र असून त्यामागचा नेमका कोणाचा आणि कशासाठी काय उद्देश?आणि निवेदन दिल्याने खरोखरच तालुक्यात सुरू असलेले सर्व अवैध धंदे कायमचे बंद होतील का?असे अनेक प्रश्न रावेर विधानसभा मतदार संघ आणि यावल-रावेर तालुक्यात उपस्थित केले जात आहे.
याबाबत माहिती अशी की तालुक्यात ग्रामीण भागात एका गावात मुख्य चौकातच अवैध धंद्यांना उत पोलीस प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष,ग्रामीण भागात गावामध्ये रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी सगळे अवैद्ध धंदे खुलेआम चालतात याला जबादार कोण?सर्रासपणे खुलेआम,झंन्ना मन्ना,मटका,पत्ता,चालतो यात काही लोकप्रतिनिधी,पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे समर्थकच पत्ता क्लब चालवितात तर काहीजण अवैध वाळूचा व्यवसाय, सागवानी लाकडाची तस्करी, निकृष्ट प्रतीची बांधकामे करीत असल्याचे तसेच पोलिसांवरच राजकीय दबाव टाकून अवैध धंदे सुरू असल्याचे आणि पोलीस अधिकारी-कर्मचार्‍यांच्या नावाने ओरड करीत असल्याचे संपूर्ण रावेर यावल तालुक्यात बोलले जात आहे अवैध आणि बनावट गावठी,देशी,विदेशी,हातभट्टी, दारूने ग्रामीण भागासह शहरात सुद्धा हैदोस घातला आहे.यामुळे ग्रामीण भागात आणि शहरात सुद्धा संध्याकाळच्या वेळेस चौकात आणि गावात सर्व जाती धर्माची महिला युवतीना रस्त्यावर चालणे मुश्किल झाले आहे. दारुडेतर रस्त्यावरुन जाण्याऱ्या वाहनाला सुद्धा अडवून वाद घालतात,चुकीची कामे करणार्‍यांवर आणि अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई करू नये म्हणून पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यावर राजकीय प्रभाव दबाव टाकून शासकीय कामकाजात हस्तक्षेप केला जातो आणि आहे असे असतांना सुद्धा अवैध धंद्या बाबत महाविकास आघाडीतील सत्ताधारी पक्षातील कार्यकर्त्यांने यावल पोलिस निरीक्षक यांच्याकडे नेमक्या कोणत्या उद्देशाने निवेदन दिले याबाबत यावल रावेर तालुक्यात संपूर्ण राजकारणात खमंग चर्चा सुरू आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *