
शिरपूर येथे भाजीपाला विक्री करण्यासाठी आलेल्या तिन वाहनांवर गुन्हा दाखल
शिरपूर येथे भाजीपाला विक्री करण्यासाठी आलेल्या तिन वाहनांवर गुन्हा दाखल
शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि ): शिरपूर येथे जळगांव जिल्ह्यातुन भाजीपाला विक्रीसाठी आलेल्या तिन वाहनांवर शिरपूर पोलीसांनी कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
अनेक दिवसांपासुन शिरपूर शहरात भाजीपाला बाजारात सोशल डिस्टनींगचा फज्दा उडत होता.भाजी पाला विक्रेते देखील मास्क लावतांना दिसत नव्हते तर खरेदी करणाऱ्यांंचे देखील सोशल डिस्टनींगचा नियम धाब्यावर बसवतांना दिसत होते.अखेर आज सकाळी शिरपूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक हेमंत पाटील यांंच्या सह पोलीस कर्मचारी नारायण पाटील,शरद ठाकरे,नाना मोरे ,दिनेश माळी,हेमंत पाटील आदींसह नगरपालिकेचे कर्मचारी यांच्या मार्फत भाजीपाला विक्रीसाठी आलेल्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.या विक्रेत्यांमध्ये शिरपूर तालुक्यासह जळगांव जिल्ह्यातुन देखील भाजीपाला वाहनांमध्ये आणला असल्याचे उघड झाले.यात जळगांव जिल्ह्यातील (१)संतोष दिपक पाटील (२) हर्षल ज्ञानेश्वर माळी वय २४(३)पवन राजमल चव्हाण वय २२ व (४)गणेश विठोबा महाजन वय २० दोन्ही चौघे रा.अडावद.ता.चोपडा जिल्हा धुळे,तर नरेंद्र सांडु पाटील वय २८ रा.मंगळुर ता.पारोळा यांनी आणलेल्या एक टाटा मँझीक व दोन पिक अप वाहनांवर कोविड १९ विषाणू संसर्गचे अनुषंगाने जिल्हाधिकारी उपाययोजना नियम २०२०चे कलम ११ नुसार भां.द.वी १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास नारायण पाटील हे करीत आहेत.