
शंकर पांडु माळी यांच्या स्मृतीदिनानिमित्त वाल्मिक नगर परिसराला शवपेटी लोकार्पण
धुळे (तेज समाचार प्रतिनिधि) : थोर स्वातंत्र सैनिक नानासो, शंकर पांडु माळी यांच्या स्मृतीदिनानिमित्त व स्वातंत्र सैनिक नानासो शंकर पांडु माळी प्रतिष्ठाण तर्फे श्री वासुदेव शंकर देवरे यांच्या कडुन,वाल्मिक नगर परिसराला शवपेटी लोकार्पण करण्यात आली… त्या प्रसंगी परिसरातील मान्यवर नगरसेवक संजयभाऊ सोनवणे, नगरसेवक देवेंद्रभाऊ राजपूत,मोहनभाऊ कोळी,संतोषभाऊ माळी,संदिपभाऊ कोळी, विनायकभाऊ कोळी,मोहनदादा मंडाले,संतोषाभाऊ भोई,राहुलभाऊ ईशी,हिराभाऊ वाकडे,सोमा धनगर,समाधान कोळी,महेश कोळी,प्यारे मोहन,बबनभाऊ येवले,बापु वाघ,विनय माळी,महेश निकम, हितेश पाटील व परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते..यावेळी मा, वासुदेव शंकर देवरे यांचा सत्कार वरील मान्यवरांनी केला