
महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा
पिंपरी (तेज समाचार डेस्क): महिलेच्या आणि तिच्या वडिलांच्या मोबाईल फोनवर मेसेज पाठवून महिलेचा विनयभंग केला. याबाबत एका मोबाईल क्रमांक धारकाविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यासह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 23) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 8623063943 या मोबाईल क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 7 ते 21 नोव्हेंबर 2020 या कालावधीत घडला आहे. आरोपीने पीडित महिलेच्या मोबाईल फोनवर आणि तिच्या वडिलांच्या मोबाईल फोनवर महिलेबाबत घाणेरडे मेसेज केले. तसेच तिचा पाठलाग करून तिचा विनयभंग केला. याबाबत आरोपी विरोधात भारतीय दंड विधान कलम 354 (ड), 501, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 67 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.