अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याने काझी सह मुलगा व संबंधितांविरुद्ध यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Featured जळगाव
Share This:

अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याने काझी सह मुलगा व संबंधितांविरुद्ध यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

यावल (सुरेश पाटील): गेल्या पाच महिन्यापूर्वी यावल येथील बोरावल गेट परिसरात अल्पवयीन मुलीचे लग्न लावुन दिल्याप्रकरणी विवाह लावणाऱ्या काझी सह इतरांविरूद्ध बालविवाह प्रतिबंध कायद्यान्वये यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन यामुळे मोठी खळबळ उडाली आहे दरम्यान या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की यावल शहरातील बोरावल गेट परिसरातील रहिवासी राजु पटेल, जरीना राजु पटेल राहणार कंडारी पोस्ट साकरे तालुका धरणगाव आणी विवाह लावणारे हाजी समद पटेल राहणार बोरावल गेट तसेच शाहरूख राजु पटेल मुलाचे वडील व आई नांव माहीत नाही या सर्वांनी मिळुन अल्पवयीन आरजु पटेल हिचा विवाह (निकाह) मुस्लीम धार्मिक रितीरिवाजा प्रमाणे लावुन दिल्याचे उघडकीस आल्याचे जिल्हा बालसंरक्षण सचिव तथा जिल्हा महीला व बालविकास अधिकारी विजयसिंग ई.परदेशी यांच्याकडील कार्यालयास दिनांक11/1/2021 रोजी प्राप्त पत्रासोबत जोडलेल्या पत्रांचे अवलोकन करता व या घटनेतील पिडीत अल्पवयीन आरजु शाहरूख पटेल वय15 वर्ष3 महीने असुन,तिचा जबाब चोपडा शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक अजीत सावळे यांनी दिनांक 19 /12/2020 रोजी यावल येथील शाहरूख राजु पटेल यांचा जबाब नोंदविल्याने हे निष्पन्न झाले असुन , आरजु शाहरूख पटेल हि अल्पवयीन असतांना तिचे वडील राजु पटेल व आई जरीना राजु पटेल यांनी बालविवाह प्रतिबंध अधिनियम2006चे पोट कलम१व३ अन्वये सौ.अर्चना राजेन्द्र आटोळे वय40वर्ष यावल बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी यावल पोलीसात तक्रार दाखल दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.घटनेचा पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी संजय तायडे हे करीत आहे .

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *