‘त्या’ तरुण मयत शेतकऱ्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणावरून पत्नीसह 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Featured जळगाव
Share This:

‘त्या’ तरुण मयत शेतकऱ्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणावरून पत्नीसह 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अनैतिक संबंधाचा परिणाम.

यावल तालुक्यातील थोरगव्हाण येथील घटना.

यावल (सुरेश पाटील) :तालुक्यातील थोरगव्हाण येथील भानुदास मंगल चौधरी वय 38 या तरुण शेतकऱ्याने दि.2मे 2021 रविवार रोजी रात्री मनवेल रस्त्यावरील त्याच्या स्वतःच्या शेतातील निंबाच्या झाडाला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली होती.मयताचे खिशात असलेल्या चिठ्ठी वरून यावल पोलिसांनी तपास चौकशी केली असता तसेच यावल पो.स्टे.ला फिर्याद दिल्यावरून मयताची पत्नी व तिच्या सोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्यास व मदत करणाऱ्या महिले विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून यावल पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला.


मयत तरुण शेतकरी भानुदास चौधरी यांनी गळफास घेण्यापूर्वी चिठ्ठी लिहून खिशात ठेवली होती चिठ्ठीत नमूद मजकुरानुसार यावल पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पीएसआय जितेंद्र खैरनार हे.कॉ.कॉन्स्टेबल गोरख पाटील यांनी तपास चौकशी केली असता मयत तरुण शेतकऱ्याची पत्नी ललिता भानुदास चौधरी हिचे तुषार संजय देशमुख राहणार तारामती नगर चोपडा याचेशी अनैतिक संबंध असल्याने आणि त्यांना तुषारची पत्नी योगिता तुषार देशमुख हिने वेळोवेळी मदत केल्याने ललिता आपल्या मयत पतीस सोडून चोपडा गावी तुषार सोबत गेली होती या कारणावरून मनस्तापाने भानुदासने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे,आरोपी तुषार देशमुख ललिता चौधरी योगिता देशमुख या 3आरोपी विरुद्ध योगराज रामकृष्ण चौधरी राहणार थोरगव्हाण याने फिर्याद दिल्याच्या कारणावरून यावल पो.स्टे.भाग-5 गु.र.नंबर77/2021भा.द.वि.कलम306,34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास पो.नि.सुधीर पाटील यांचे आदेशान्वये पीएसआय जितेंद्र खैरनार करीत आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *