
इंदौरहून शिर्डीला जाणारी बस उभ्या ट्रकवर धडकली;३४ जखमी
शिरपूर – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वर सांगवी गावातील नमो श्री पेट्रोल पंपच्या समोर इंदोर येथून शिर्डी कडे जाणारी एक खाजगी प्रवासी बस आज सायंकाळी चार वाजताच्या सुमारास एका उभ्या ट्रक वर जाऊन धडकल्यामुळे सदर बस मधील 34 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी इसमांना स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्मचारी यांनी ग्रामीण रुग्णालय शिरपूर येथे उपचार कामे दाखल केलेले आहे. स्थानिक ग्रामस्थांमध्ये तरुण शर्मा, भास्कर धोबी व जिल्हा परिषद सदस्य योगेश बादल यांनी परिश्रम घेतले.
जखमींमध्ये इंदौर येथील विकी केसवाणी, पुजा विकी केसवाणी ,विकास वासवाणी, नंदलाल राजदेव, आशा चेलानी, धरमपाल उदासी, चिराग उदासी, दिपक उदासी, दिपक उदासी, जयपाल दासवाणी, धोलक कटारीया, करीना कटारीया, मंजु शर्मा, चालक अफसर, हनी सचदेव, रीना सचदेव, सतिश तलरेजा, कोमल तलरेजा, अशिशा तावजा, दिपा उधाणी, हिरालाल सचदेव, अशोक नारायणदास, कोमल बंधवा, लीना कटारीया, अशिमा उधाणी, रोशनी लुधवाणी, कोहिनुर लुधवाणी, निखील लुधवाणी, दिपीका मोटवाणी, भारती लोकवाणी, नयन अडवाणी, अशोककुमार बदलानी राजेश जगवाणी, महेश हरिषाणी, विशाल तहरानी हे जखमी झाले आहेत.