20 वर्षीय दादाने 6 वर्षीय चुलत बहिणीचा केला विनयभंग

Featured जळगाव
Share This:

20 वर्षीय दादाने 6 वर्षीय चुलत बहिणीचा केला विनयभंग

जागतिक आदिवासी दिनाच्या पूर्वसंध्येला आदिवासी युवकाकडून अस्शील कृत्य.

सातपुड्यातील जामुनझिरा येथील घटना.

यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल.

यावल ( सुरेश पाटील ): तालुक्यातील सातपुडा डोंगर भागातील एका 20 वर्षीय आदिवासी तरुणाने आपल्या सख्या 6 वर्षीय चुलत बहिणीला केळी खायला देतो असे आमिष दाखवून लैगिक अत्याचार केल्याची घटना जागतिक आदिवासी दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे दिनांक 8 ऑगस्ट 2020 शनिवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास यावल तालुक्यात घडली. रात्री उशिरा यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की 6 वर्षीय आदिवासी बालिकेच्या आईने यावल पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की आरोपी रोहन बिलासिंग पावरा वय 20 राहणार जामुनझिरा तालुका यावल याने दि.8 ऑगस्ट 2020 शनिवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास माझ्या मुलीस मला व तिच्या वडिलांना न विचारता केळीखायला देण्याचे आमिष दाखवून त्याचे कायदेशिर देखभालीतून केळीचे शेतात घेऊन जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि तशी घटना मुलीने घरी आल्यावर सांगितली कारणावरून यावल पोलीस स्टेशनला भाग 5 गु.र.नं.138 /2020 भा.द.वी.376 (फ),(i),354(अ)(i) 363 सह पोस्को 3 (अ) ब 4,5 (म) (न) 6,7,8, 11/12 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे पो.नि.अरुण धनवडे यांच्या आदेशान्वये पि.एस.आय. सुनिता कोळपकर या करीत आहेत.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *