80 फुटी रस्त्यावरील स्मार्ट इंडिया डिल ऑफ लोन दुकानाचा मालक फरार धुळेकर नागरिकांना लाखोंचा रुपयाचा घातला गंडा

धुळे
Share This:

80 फुटी रस्त्यावरील स्मार्ट इंडिया डिल ऑफ लोन दुकानाचा मालक फरार धुळेकर नागरिकांना लाखोंचा रुपयाचा घातला गंडा.

धुळे (तेजसमचार प्रतिनिधि):शहरात काही वर्षांपूर्वी रामस्वामी नावाचा एक ठग धुळ्यात आला होता त्यांने धुळ्यातील नागरिकांना वस्तूच्या मोबदल्यात पैसे देतो व व्यवसाय करण्यासाठी पैसे देतो काही रक्कम माझ्या जवळ ठेवा त्याच्या दुप्पट पैसे करून देतो असे आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा घातला होता. त्याच पद्धतीने आज पुन्हा 80 कुठे रस्ता चौकातील एका दुकानात असाच रामस्वामी ठग धुळ्यात पुन्हा एकदा धुळेकरांना अनुभवायला मिळाला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार धीरज बुधा वाडीले व्यवसाय हातमजुरी राहणार साखरा जकात नाका महिंदळे मरी माता मंदिर जवळ धुळे. शहरातील एका हॉटेलमध्ये काम करतात यांना हॉटेलमध्येच टेबल वरती एक पॉम्पलेट दिसले.त्यावर SMART INDIA DEALS OF LOAN मोबाईल संपर्क नंबर असा मजकूर पॉम्पलेट एम पॅटर्न मिळाले त्यावर त्यांनी संपर्क केला असता त्यांना प्रकाश टॉकीज चौक सुर्यमुखी मंदिराजवळ डॉ. सुभाष भामरे यांच्या दवाखान्या समोर धुळे येथे
असलेल्या ऑफीस मध्ये जावून सुधाकर देसले व दिपक निकम यांना यांना ते भेटले व त्यांनी माहिती घेतली त्यांना असे सांगितले की तुम्ही कंपनीत 500/- रुपये व कागदपत्र जमा करुन कंपनीचे सभासद व्हा त्यांनी लगेचच 500/-रुपये व कागदपत्र 1. रहिवासी दाखला 2. दोन फोटो 3. आधार कार्ड 4. पॅन कार्ड 5. मतदान कार्ड 6. बैंक पासबुक झेरॉक्स 7. बैंक स्टेटमेंट सहा महिने 8. गैस कार्ड 9.टी.सी.झेरॉक्स 10. रेशन कार्ड असे ताब्यात घेतले व तसेच सोबत आलेल्या जामीनदार कलाबाई बुधा वाडीले यांचे देखील आधार कार्ड व पॅनकार्ड चे झेरॉक्स इत्यादी कागदपत्र दिल्याने त्यांनी मला पैसे भरण्याची पावती देवुन तुम्ही सभासद झाले आहेत व तुम्हाला मोबाईलवर मेसेज येईल तेव्हा
10,000/- रुपये प्रोजक्ट फाईलसाठी भरावे लागतील व लोन (कर्ज) 2.88,752/- रुपये मंजूर झाल्यावर तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा केले जाईल असे सांगितले.

त्यानंतर दिनांक 03/02/2020 रोजी मला माझ्या मोबाईल क्र. 8999160920 यावर
QP-IDEALS मेसेज आला सदर मेसेज मध्ये Dear Dhiraj budha vadhile congrats
you have qualified for your loan application of Rs 2,88,752/- from IDL
please upload the required documents for final loan approval T&C Apply
आज दुपारी परत ज्या ठिकाणी सदर कागदपत्रे जमा केली होती मेसेज आल्यानंतर तिथे विचारपूस करण्यासाठी ते गेले असता
तेथील ऑफीस मध्ये कामावर असलेल्या कल्याणी जाधव व सारीका देवरे यांना धीरज वाडीले यांनी मेसेज दाखविला असता त्यांनी मला 10,000/- रुपये भरण्यास सांगितले तेव्हा त्यांनी कल्याणी जाधव
यांच्याकडे 10,000/-रु भरले व कल्याणी जाधव यांनी मला 10,000/- रुपये भरण्यची
पावती दिली व सांगितले की, पाच ते सात दिवसात अकाउंटला 2,88,752 /- रु जमा केले जातील.
परंतु आजपर्यंत कोणाचा फोन नाही लागत नाही आणि कार्यालय बंद आहे त्यामुळे फसवणूक झाली आणि पैसे बुडाले खात्री झाली त्यांच्यासह अन्य जवळजवळ तीस ते चाळीस जण नागरिकांचे अशाच पद्धतीने हजार रुपये असा एकूण लाखो रुपयांचा अपहार करून सदर व्यक्ती डोळ्यातून पळून गेलेला आहे याप्रकरणी धीरज वाडीले यांनी आझाद नगर पोलीस ठाणे गाठले स्वतः फसवणूक झाली याबाबत लेखी तक्रार दाखल केली असून आजाद नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास आझादनगर पोलिस करीत आहेत.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *