केळी व्यापाऱ्यांनी लावला 8 शेतकऱ्यांना 13.50 लाखांचा गंडा

Featured जळगाव
Share This:

केळी व्यापाऱ्यांकडून 8 शेतकऱ्यांची 13 लाख 50 हजारात फसवणूक.

रावेर व यावल तालुक्यातील 2 केळी व्यापार्‍यांन विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल.

यावल  (सुरेश पाटील) :यावल शहरातील 6 आणि तालुक्यातील 2 शेतकऱ्यांची केळी खरेदी करून शेतकऱ्यांना केळीचे पेमेंट देण्यास टाळाटाळ करून एकूण आठ शेतकऱ्यांची 13 लाख 50 हजार रुपयात फसवणूक केल्याने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस स्टेशनला 2 केळी व्यापाऱ्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गणेश लक्ष्मण रावते वय 61 धंदा शेती व वैद्यकिय व्यवसाय रा.यावल यांनी यावल पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की टाकरखेडे शिवारामधे शेत गट नं 24 असुन त्यामधे मी केळी पिक घेत आहे सन 2019 मधे मी माझे वरिल शेतामधे केळी लावलेली होती सन 2020 मधे केळीचे पिक पुर्ण झाले एप्रिल 2020 मधे रावेर येथील दत्तगुरु केला एजन्सी मालक केळीचे व्यापारी सुभाष कांतीलाल पाटील रा. पुनखेडे ता रावेर ह.मु भगवतीनगर जुना सावदा रोड गट नं 740 रावेर हे त्यांचे सोबत गणेश केला गृप सांगवी खु.ता यावलचे रविंद्र ओंकार सपकाळ रा.सांगवी खु.ता यावल हे आले त्यांनी त्यांचे केला एजन्सीची ओळख व माहीती देवुन माझे कडील केळी मागणी केली ते दोन्ही जळगांव जिल्ह्यातील असल्याने मी त्यांचेवर विश्वास ठेवुन त्यांना केळी देण्याचा होकार दिल्याने त्यांना मि 3 लाख 7 हजार 961 रुपयाची केळी विकत दिली आहे. त्याचप्रमाणे शहरातील देवनाथ भावसिंग पाटील यांच्याकडून 1 लाख 52 हजार 604 रुपये, अरुण कुमार सुपर खेडकर 2 लाख 84 हजार 543, पराग विजय सराफ1लाख2 हजार 294, संदीप सतीश वायकोळे 1लाख, संभाजी काशिनाथ लावणे 17 हजार 970 तर तालुक्यातील नावरे येथील देविदास उदयसिंग पाटील 1 लाख 80 हजार 286, महेंद्र शिवाजी पाटील 2लाख 5 हजार 984 रुपये अशाप्रकारे एकूण आठ शेतकऱ्यांची 13 लाख 65 हजार 842 रुपयाची केळी विकत दिली होती त्याचे पैसे न दिल्यामुळे फसवणूक केल्याने सुभाष कांतीलाल पाटील राहणार पुनखेडा तालुका रावेर. हल्ली मुक्काम सावदा रोड रावेर. रविंद्र ओंकार सपकाळ रा. सांगवी खुर्द तालुका यावल 2 केळी व्यापाऱ्यांन विरुद्ध विरुद्ध यावल पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सौ.सुनीता कोळपकर करीत आहेत.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *