
शिरपूरात कोरोनाचा थैमान, पुन्हा सापडले 7 पॉझिटिव्ह
शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि). शिरपूर तालुक्यात कोरोनाचे संक्रमण ज्या गतिने वाढत आहे, ती फारच चिंतेची बाब आहे. मागील काही दिवसात कोरोना संक्रमितांचा आंकडा फारच झपाट्याने वाढत आहे. गुरुवारी शिरपूर शहर उपजिल्हा रुग्णालय येथील 14 रुग्णांचा अहवाल आला, त्यात 7 लोकांची रिपोर्ट पॉझिटिव्ह आणि 7चा रिपोर्ट निगेटिव्ह आली आहे. अंबिका नगर शिरपूर येथील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील कुटूंबातील 6 लोकांचा ज्यात 38 वर्षीय पुरुष, 21 वर्षीय स्त्री, 17 वर्षीय मुलगी, 14 वर्षीय मुलगा, 15 वर्षीय मुलगी, 8 वर्षीय मुलगा आहेत. या सहा लोकांसोबतच 56 वर्षीय पुरुष पारधीपूरा शिरपूरचा आहे.