जामनेर तालुक्यात आढळले ७ कोरोनाचे रुग्ण ; १ मुक्त तर दोघांचा मृत्यू

Featured जळगाव
Share This:
जामनेर : – लॉकडाऊन सुरु झाल्या पासुन प्रारंभी कोरोना मुक्त असलेला तालुका आता लॉक डाऊन संपण्याच्या उंबरठयावर कोरोना बाधीत रुग्णांच्या वाढत्या संख्येने चिंताग्रस्त झाला आहे.तालुक्यातील बाधीतांची एकुण संख्या ७ झाली असुन त्यात दोघांचा मृत्यु झाला आहे.
दोंदवाडा येथील मृत बाधीत वयोवृध्दाच्या संपर्कातील २० वर्षीय युवक व पाळधी येथील बाधीत इसमाच्या संपर्कातील ७ वर्षीय बालिका अशा दोघांचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे . शहरातील दि.२३ रोजी मृत झालेल्या महिलेचा अहवाल सुद्धा पॉझीटीव्ह आला असुन प्राथमिक आरोग्य केंद्रात फॉर्मासीस्ट असलेल्या शहरातील एका डॉक्टरांचा रिपोर्ट सुध्दा पॉझीटीव्ह आला आहे.
तालुक्यात काल एकाच दिवशी ग्रामीण व शहरी भागात प्रत्येकी २ असे ४ अहवाल पॉझीटीव्ह आल्याने तालुका चांगलाच हादरला आहे तालुक्यातील ग्रामीण भागातील पॉझीटीव्ह  ५ तर शहरातील बाधीताची २ अशी एकूण संख्या ७ झाली आहे.दोंदवाडा येथील वृद्ध व शहरातील एक महिला अशा २ कोरोना बाधीतांचा मृत्यु झाला आहे.
दि.२७ रोजी रात्री पळासखेडे बुद्रुक येथील एक रुग्ण मुक्त होऊन आपल्या घरी परत आलेला असून पळासखेडे बुद्रुक २,लोणी मयत तरुणी १,पाळधी येथील महिला १ तर शहरातील मयत व पॉझिटिव्ह रुग्णांनाच्या संपर्कातील २० अशा एकूण सुमारे २४ संशयित रुग्णाचा अहवाल येणे बाकी असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांनी सांगितले.
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *