6 वर्षीय बालकाचाअज्ञात इसमाकडून दगडाने ठेचून हत्या

Featured धुळे
Share This:

नवी अंतुर्ली येथे उघडकीस आली हृदयद्रावक घटना

मजुरीसाठी शेतात गेलेल्या आई सोबत गेला होता मुलगा

तपास यंत्रणा रात्रीच घटनास्थळी दाखल,

शिरपूर तालुक्यातील नवी अंतुर्ली शिवारात एका अज्ञात इसमाकडून गावातील एका सहा वर्षीय बालकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना दि.२३ डिसेंबर रोजी सायंकाळी उशिरा उघडकीस आली आहे.भरदुपारी एका अज्ञान बालकाची हत्या झाल्याचे उघडकीस आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच तालुका व जिल्ह्यातील तपास यंत्रणा रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
मोहित दिनेश ईशी वय ६ रा.अंतुर्ली असे हत्या झालेल्या बालकाचे नाव आहे.मोहित हा गावातील एका शेतात मजुरीसाठी गेलेल्या आई सोबत गेला होता.अंतुर्ली
येथील दिनेश शिवाजी ईशी व सौ.ज्योती दिनेश ईशी यांचा तो मुलगा आहे कोरोनामुळे शाळा बंद असल्याने मोहितला घरी एकटे सोडण्याएवजी आई शेतात सोबत घेऊन गेली होती मुलाला बांधावर बसऊन शेतात निंदनी करत असताना आपला मुलगा शेतात दिसत नसल्याचे लक्षात आलेवर सर्वत्र शोध घेत असताना सायंकाळी एका शेतात मुलगा मृत अवस्थेत आढळून आला.अज्ञात इसमाकडून दगडाने ठेचून मारल्याचे निदर्शनात आल्याची वार्ता गाव परिसरात वाऱ्यासारखी पसरली.
सदर घटनेची माहिती मिळताच
घटनास्थळी डीवायएसपी अनिल माने,पोलीस निरीक्षक हेमंत पाटील,पीएसआय सोनवणे,पोहेकॉ गुलाब ठाकरे,पोलीस नाईक अनिल शिरसाट,ललित पाटील,दिनेश माळी, रवींद्र ईशी,सनी सरदार, बापूजी पाटील,अमित जाधव,पाटील,उमेश पाटील,स्वप्नील बांगर आदींनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात ठेवली.तर घटनेचे गांभीर्य पाहता घटनास्थळी फॉरेन्सिक पथक,स्वान पथक, सायबर क्राईम,स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, आदी पथकाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रात्रीच धाव घेत सर्व शक्यता तपासुन घेत नमुने घेण्यात आले.
मोहितची हत्या का व कुणी केली याचा शोध पोलीस पथकातर्फे घेतला जात आहे.या घटनेचा पुढील अधिक तपास शिरपूर शहर पोलीस करीत आहेत.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *