सातपुडयातील लंगडाआंबा जंगलातुन चुलत भावा बरोबर मोटरसायकलवर जाणाऱ्या तरुणीचे अपहरण 6 जणांवर गुन्हा दाखल

Featured जळगाव
Share This:

सातपुडयातील लंगडाआंबा जंगलातुन चुलत भावा बरोबर मोटरसायकलवर जाणाऱ्या तरुणीचे अपहरण 6 जणांवर गुन्हा दाखल

यावल (सुरेश पाटील): तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या कुशीत असलेल्या गाडऱ्या गावातील एका आदीवासी अल्पवयीन तरूणी आपल्या नियोजीत पती सोबत आपल्या गावी गाडऱ्या येथे जात असतांना6 जणांनी अपहरण करुन पळवुन नेल्याप्रकरणी मध्यप्रदेशातील राहणाऱ्या 6 जणांविरूद्ध यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की दि.9जुलै रोजी फिर्यादी अल्पवयीन तरूणी ही वाघझीरा तालुका यावल येथील चुलत बहीणीस भेटायला गेली होती, दिनांक12जुलै रोजी ही तरुणी आपल्या नियोजीत पती रवी हुकाऱ्या बारेला राहणार वाघझीरा तालुका यावल व याच्या सोबत चुलत भाऊ गणदास खुशाल बारेला आपल्या गाडऱ्या गावी चुलत भाऊच्या मोटरसायकलवरून जात असतांना दुपारी12वाजेच्या सुमारास लंगडाआंबा गावापासुन सुमारे1किलोमिटर अंतरावर2 मोटरसायकल समोर लावल्याच्या दिसुन आल्यात त्यामुळे तरुणीच्या नियोजीत पती रवी बारेला यांने त्याच्या ताब्यातील मोटरसायकल हळु केली असता जंगलातील झाडाच्या पाठीमागुन जागीराम गुलाब बारेला,नेमसिंग जागीराम बारेला,अनेरसिंग गुलाब बारेला, नितेश जागीराम बारेला,शांताराम गुलाब बारेला सर्व राहणार पलासकोट तालुका भगवानपुरा जिल्हा खरगोन मध्यप्रदेश ह.मु . गाडऱ्या तालुका यावल आणी मंसाराम मददास बारेला रा. वालपानी तालुका भगवानपुरा जिल्हा खरगोन मध्यप्रदेश या सर्वांनी मिळुन तरुणीच्या नियोजीत पती रवी बारेला आणी चुलत भाऊ गणदास बारेला यांना रस्त्यात अडवुन दोघांना लाथाबुक्याने व काठयांनी मारहाण करीत यातील नितेश जागीराम बारेला याने त्या अल्पवयीन तरुणीस तुझ्या चुलत भावाला आणी कुटुंबास जिवे ठार मारण्याची धमकी देवुन आपल्या सोबत प्रथम ढोलगा या गावी व नंतर मोटरसायकलवर बसवुन आपल्या सोबत वालपानी व नंतर सुतपुरी मध्यप्रदेश या गावी घेवुन गेलेत,दरम्यान अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा चुलत भाऊ गणदास बारेला हा तरूणीचा शोध घेत भगवानपुरा पोलीस स्टेशन येथे पहोचला त्यांनी दिलेल्या माहीतीच्या आधारवर पोलीसांनी अल्पवयीन तरुणी शोध घेतले व त्या तरुणीस पोलीस स्टेशनमध्ये बोलवुन तरूणीने दिलेल्या जबाबात नितेश बारेला यांने पळवुन आणले नसल्याचे सांगीतले होते.दरम्यान यावल पोलीस स्टेशनला दि.20जुलै रोजी अल्पवयीन तरुणीने दिलेला आपला जबाब यावेळी फिरवल्याने अखेर तरूणीने दिलेल्या फिर्यादीवरून मध्यप्रदेशातील रहीवाशी सर्व 6 जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन,गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक अजमल पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अमलदार संजय तायडे व युनुस तडवी हे करीत आहे.दरम्यान त्या अल्पवयीन तरुणीस पोलीसांनी त्याच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले असुन,अपहरण करुन पळवुन नेलेल्या संशयीत तरुण नितेश बारेला या तरूणाचे या तरूणीवर प्रेम असल्याचे तालुक्यात बोलले जात आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *