
जळगावात आज 6 कोरोना बाधित रूग्ण आढळले -कोरोना बाधित रूग्ण 199
जळगावात आज 6 कोरोना बाधित रूग्ण आढळले -कोरोना बाधित रूग्ण 199
जळगाव (तेज समाचार डेस्क) : जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या 40 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यापैकी 34 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून सहा व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
पॉझिटिव्ह आढळलेल्या सहाही व्यक्ती या जळगाव शहरातील असून यामध्ये 4 पुरुष तर 2 महिलांचा समावेश आहे. यात शाहूनगर येथील 10 वर्षीय मुलगा व 24 वर्षाचा तरुण, आदर्शनगर येथील 22 तरुण, समर्थ कॉलनीतील 30 वर्षाचा पुरुष तर रेल्वेलाईन पवननगर येथील 30 वर्षीय महिला व हरिविठ्ठल नगरातील 38 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 199 इतकी झाली असून त्यापैकी एकोणतीस व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी गेल्या आहेत तर पंचवीस कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.