जी.एम.फाऊनडेशन व निरामय फाऊनडेशन संघ RSS संचलित यांच्यामाध्यामातून धुळे शहरासाठी 500 पी.पी.ई कीट वाटप

Featured धुळे
Share This:

धुळे (तेज समाचार प्रतिनिधि ) : देशासह संपूर्ण राज्यात कोरोना महामारी ने थैमान घातले असून जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच अत्यावश्यक सेवेमध्ये सर्व डॉक्टर आपल्या खासगी रुग्णालयात रुग्ण सेवा देत असतांना डॉक्टर्स, रुग्ण सेवक कर्मचारी यांच्या सुरक्षतेसाठी मा. आमदार गिरीश महाजन यांच्या जी.एम.फाऊनडेशनच्या माध्यमातून धुळे शहरासाठी निरामय फाऊनडेशन संघ RSS संचलित यांच्यामाध्यामातून धुळे शहरासाठी ५०० पी.पी.ई कीट उपलब्ध करण्यात आले. यामुळे डॉक्टर स्वतः सुरक्षित असून ते रुग्ण सेवा करण्यासाठी तत्पर आहेत. त्या किटचे वाटप खासदार डॉ.सुभाषजी भामरे, मा. प्रशांतजी मोराणकर, भाजप जिल्हाध्यक्ष अनुपजी अग्रवाल, धुळे मनपा महापौर चंद्रकांत सोनार, संजयजी पाटील, राजेश पाटील व कार्तेकते इत्यादींच्या माध्यमातून हॉस्पिटल्स, महानगरपालिका, जिल्हारूग्णालय, पोलिस डिपार्टमेंट यांना वाटप करण्यात येणार आहे व आज त्याची सुरुवात विघ्नहर्ता हॉस्पिटल पासून करण्यात आली आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *