
50%अनुदानाची रक्कम 64 हजार रुपये गेल्या7वर्षांपूर्वी भरणा केल्यावर सुद्धा महिला लाभार्थीला लाभ मिळाला नाही
50%अनुदानाची रक्कम 64 हजार रुपये गेल्या7वर्षांपूर्वी भरणा केल्यावर सुद्धा महिला लाभार्थीला लाभ मिळाला नाही.
शेळीगट वाटप कार्यक्रमाचा आणि जिल्हा पशुसंवर्धन विभागाचा भोंगळ कारभारचा नमुना.
यावल (सुरेश पाटील): 50%अनुदानाची रक्कम 64 हजार रुपये गेल्या7वर्षांपूर्वी भरणा केल्यावर सुद्धा महिला लाभार्थीला लाभ मिळाला नसल्याने शेळीगट वाटप कार्यक्रमाचा आणि जिल्हा पशुसंवर्धन विभागाचा भोंगळ कारभारचा नमुना समोर आलेला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की जळगाव तालुक्यातील खेडी खुर्द येथील वंदना विलास सोनवणे या महिलेने दि.6जुलै2021मंगळवार रोजी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त जळगाव यांच्याकडे दिलेल्या तक्रार अर्जात आर.के.व्ही.आय योजना नाविन्यपूर्ण योजना 2013–14 शेळी गट वाटप विषयान्वये आणि नमूद संदर्भांन्वये म्हटले आहे की मी सन 2013 14 राष्ट्रीय कृषी योजना अंतर्गत नाविन्यपूर्ण शेळी गट वाटप कार्यक्रमात अर्ज केला होता,त्यानुसार माझी त्या लाभार्थीसाठी निवड होऊन सर्वसाधारण स्री(प्रतिक्षाधिन) प्रकारांमधून50%अनुदानासाठी लागणारा भाग रुपये 64हजार जळगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा यांच्याकडे दि.26/6/2014 डी.डी.नं.265323ने पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे जमा केला आहे.
7वर्ष कालावधी उलटला तरी अद्याप लाभ मिळाला नाही व माझी रक्कम खात्यामध्ये जमा पडून आहे मागील7वर्षात मला संबंधित खात्यामार्फत कोणत्याही लेखी व तोंडी सूचना दिलेल्या नाही मी स्वतः आपल्या क्षेत्रीय कार्यालय व आपल्याशी संपर्क साधला माझे दि.1/1/2020चे पत्र पहावे मी पत्र दिल्यावर पशुधन विकास अधिकारी(वि) पंचायत समिती जळगाव यांनी मागील तारखेचे म्हणजे जा.क. आर.आर.124–227/2019दि.31/12/2019 हे पत्र तब्बल पाच वर्षानंतर दिले मागील पाच वर्षात एकही लेखी पत्र अथवा संदेश नाही त्यामुळे मी शासन निर्णयानुसार कामकाज करण्यासाठी असमर्थता दाखविली आहे हे कशावरून ठरविले हेच समजू शकत नाही मला लाभ द्यायचा होता म्हणूनच आपल्या निवडसूची जाहीर झाल्यावर नियमानुसार लागणारा 50%भाग रुपये 64 हजार मी शासनाकडे जमा केलेला होती आणि आहे पुन्हा कोणती पूर्तता करावयाची आहे याची कोणतेही सूचना पत्र मला5वर्षात मिळालेले नाही आपल्या 31/12/2019चे पत्रानुसार मी दि.10/1/2020 रोजी पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती जळगाव यांचे कार्यालयात संपर्क साधला असता योजनेत निवड होऊन व आवश्यक भाग रोख भरणा करून योजनेचा लाभ न देता स्थानिक पोलिस स्टेशनला पत्र देऊन माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला योजनेमध्ये पोलीस स्टेशनला पत्र देण्याचा नेमका उद्देश समजलेला नाही, यावरून असे दिसून येते की आपण माझी व वरिष्ठ कार्यालयाची दिशाभूल केली आहे तरी माझी या पत्राद्वारे पुन्हा विनंती करण्यात येते की मला निवड सूचीनुसार योजनेचा लाभ मिळावा अन्यथा मी येत्या 1ऑगस्ट2021पासून जिल्हाधिकारी जळगाव कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहे याची आपण नोंद घ्यावी असे दिलेल्या निवेदनात वंचित असलेली महिला वंदना विलास सोनवणे हिने म्हटलेले आहे.