5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन हत्या, गावकऱ्यांनी आरोपीला रंगेहाथ पकडलं

Featured देश
Share This:

लखनऊ  (तेज समाचार डेस्क):  उत्तर प्रदेशातील बंदायू जिल्ह्यात काळजाचा थरकाप करणारी घटना समोर आली आहे. अवघ्या ५ वर्षांच्या चिमुकलीवर एका नराधमाने बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. नराधम एवढ्यावरच थांबला नाही तर चिमुकलीवर बलात्कार केल्यानंतर त्यानं तिची हत्या देखील केली आहे. बंदायू जिल्ह्यातील एका गावातील 5 वर्षांची निष्पाप मुलगी आपल्या आईसोबत शेतात गेली होती. शेतात गेल्यानंतर ती आपल्या आईपासून काही अंतरावर गहू निवडत होती. यादरम्यान पीडित मुलीला एकटी पाहून आरोपीने संधीचा फायदा घेतला आणि त्या चिमुकलीला आपल्या विकृतीची शिकार बनवलं. एवढंच नाही तर बलात्कार केल्यानंतर आरोपीनं तिची गळा आवळून हत्या देखील केली.

हा प्रकार घडत असताना शेताच्या दिशेनं जाणाऱ्या काही गावकऱ्यांनी संबंधित प्रकार पाहिला. पीडित मुलगी मृतावस्थेत तिथेच पडली होती. त्यांतर गावकऱ्यांनी 30 वर्षीय आरोपी युवकाला रंगेहाथ पकडलं आणि बेदम मारहाण केली. गावातील एकाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

दरम्यान, 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांनी आरोपीला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या हवाली केलं आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात असून आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन एसएसपी संकल्प शर्मा यांनी दिलं आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *