
शिरपूर शहरात 5 दिवस जनता कर्फ्यू
शिरपूर शहरात 5 दिवस जनता कर्फ्यू
शिरपूर (तेज समाचार डेस्क): शिरपूर वरवाडे नगरपरिषद क्षेत्रात कोरोना विषाणूचे ९४ रुग्ण आढळल्यामुळे दि. १७ जून ते २१ जून २०२० असा पाच दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्यात आला.
शहरातील हॉस्पिटल व त्या सलंग्न मेडिकल सुरु राहतील. शहरातील इतर मेडिकल सकाळी ८ ते १२ पर्यंत सुरु राहतील. इतर सर्व दुकाने बंद राहतील.
दूध विक्रेत्यांसाठी सकाळी ७ ते ८ व सायंकाळी ७ ते ८ही वेळ निश्चित करण्यात आलेली आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897, मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) (3) व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदीनुसार दंडनीय योग्य त्या कायदेशीर कारवाईस पात्र राहील, याची नोंद घ्यावी.
मा.प्रांताधिकारी, शिरपूर.
मा. तहसीलदार, शिरपूर.
मा. पोलीस निरीक्षक, शिरपूर.