जळगाव जिल्ह्यात आज पर्यंत 429 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज

Featured जळगाव
Share This:

जळगाव (तेज समाचार प्रतिनिधि). जळगाव जिल्हा कोरोनाचा होटस्पॉट बनला आहे. जिल्ह्यात झपाट्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आज पर्यंत जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ११३ जणांचा मृत्यू झाला आहे. पण चांगली गोष्ट ही आहे कि आतापर्यंत ४२९ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे.

– आरोग्या मंत्री राजेश टोपे यांनी घेतला आढावा
बुधवारी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांविषयीचा आढावा घेतला. जळगाव जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने त्यांनी देखील याबाबत चिंता व्यक्त केली होती. यासंदर्भात जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत ९०७ रुग्ण करणा बाधित असल्याचे कळविण्यात आले आहे. यात ४२९ रुग्ण हे कोरोना मुक्त झाले आहे. तर कोरोनामुळे ११३ जणांचा मृत्यू झाला आहे. ३६५ रुग्णांवर उपचार सुरू असून चाळीस रुग्णांची प्रकृती अत्यवस्थ आहे. तर ३२५ रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. जिल्ह्यातील ६२४ रुग्णांचे तपासणीचे अहवाल सध्या येणे बाकी आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोनामुळे वाढलेल्या मृत्यूदरासंदर्भात परीक्षण समिती नेमण्यात आली आहे. ही परीक्षण समिती मयत झालेल्या रुग्णांचा अभ्यास करून अहवाल देणार आहे. त्यामुळे जिल्हावासियांचे या अहवालाकडे लक्ष लागून आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *