
नऊ वर्षीय चिमुकलीसोबत अश्लील चाळे-37 वर्षीय अटक
नऊ वर्षीय चिमुकलीसोबत अश्लील चाळे-37 वर्षीय अटक
मुंबई (तेज समाचार डेस्क): नऊ वर्षीय मुलीला जबरदस्तीने घरात ओढत नेऊन तिच्यासोबत अश्लील चाळे केले. याप्रकरणी एका 37 वर्षीय नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 29) दुपारी साडेपाच वाजता देहूरोड परिसरात घडली.
अरुण शंकर सहारे (वय 37, रा. किवळे) असे अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे. याबाबत पिडीत मुलीच्या 35 वर्षीय आईने शनिवारी (दि. 31) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या नऊ वर्षीय मुलीला जबरदस्तीने त्याच्या घरात ओढत नेले. घरात नेऊन तिच्यासोबत अश्लील चाळे करून तिचा विनयभंग आणि लैंगिक शोषण केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.