
मालेगावात आणखी 5 नवे करोनाबाधित रुग्ण
नाशिक (तेज समाचार डेस्क) : आज नाशिक जिल्ह्यातील तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या ५३ पैकी ५ संशयितांचे रिपोर्ट करोना पॉजिटिव्ह आले असुन हे पाचही रुग्ण मालेगावचेच असल्याने खळबळ उडाली आहे. मालेगाव हे आता करोना प्रादुर्भावाच्या दृष्टीने अति संवेदनशील बनले आहे. एकट्या मालेगावमधील रूग्णांची संख्या १४ वर गेली आहे, त्यानंतर चांदवड १, निफाड १ ( संपूर्णत: बरा) नाशिक शहरात ३ असे एकुण १९ रुग्ण जिल्ह्यात आहेत.