
शिरपूर ब्रेकिंग : आणखी 3 लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह
शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि). शिरपूर येथून स्वेब टेस्ट साठी पाठविल्यागेलेल्या १५ अहवालां पैकी तीन अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या तीन रुग्णांसोबतच शिरपूरांत कोरोना रुग्णांची संख्या आता 40 वर पोहोचली आहे. आज मिळालेल्या तीन रुग्णांमध्ये करवंद नाका येथील ६२ वर्षीय महिला, पारधीपूरा परिसरातील 3० वर्षीय पुरूष आणि अंबिका नगर परिसरातील ८६ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. दरम्यान मंगळवारी दिवसभरात सहा रूग्ण कोरोना बाधित आढळून आल्याने धुळे जिल्ह्याची कोरोना बाधितांची संख्या १७० वर पोहचली आहे.