MSME क्षेत्राला 3 लाख कोटींचे पॅकेज- निर्मला सीतारामन

Featured देश
Share This:

नवी दिल्ली  (तेज़ समाचार डेस्क ): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केल्यानंतर आज, बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केलीय. एमएसएमई क्षेत्राला कोणत्याही गॅरंटीशिवाय 3 लाख कोटींचं कर्ज उपलब्ध होईल अशी माहिती सीतारामन यांनी दिली. त्यांच्या या घोषणेमुळे एमएसएमई क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटींचं पॅकेज जाहीर करण्यापूर्वी विविध केंद्रीय मंत्र्यांशी, विविध तज्ज्ञांशी चर्चा केली अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेलं पॅकेज हे देशाच्या विकासासाठी जाहीर केलेलं पॅकेज आहे.
देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटींचं जाहीर केलं. या 20 लाख कोटींच्या पॅकेजचे तपशील काय आहे याबाबत संपूर्ण देशाला उत्कंठा लागली होती. दरम्यान गुरूवारी आणि शुक्रवारी देखील अर्थमंत्री पत्रकार परिषद घेऊन आणखी काही घोषणा करणार आहेत.
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *