नरढाणा जवळ पिकअप व्हॅनचा भिषण अपघात 3 ठार, 2 गंभिर ,18 जखमी

Featured धुळे
Share This:

नरढाणा जवळ पिकअप व्हॅनचा भिषण अपघात 3 ठार, 2 गंभिर ,18 जखमी

धुळे (तेज़ समाचार प्रतिनिधि ): देशात लॉक डाऊन परिस्थिती सुरु असताना भिवंडीतील पावरलूम मध्ये काम करणारे मजूर पिकअप व्हॅनने उत्तर प्रदेशात घरा कडे परताना नरढाणा गावाजवळ मजूरांचे गाडीचा भिषण अपघात झाला.यात तीन जण जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले.20 किरकोळ जखमी झाले.

याबाबत मिळालेली माहिती की, देशात लॉक डाऊन परिस्थिती सुरु असताना भिवंडीतील पावरलूम मध्ये काम करणारे मजूर हे उत्तर प्रदेशात राहणारे आहेत.लॉक डाऊन परिस्थिती त्यांचे जवळ उदरनिर्वाह चालवित होते.परंतू दिड महिन्यात जवळील साहित्य संपले व हाताला काम मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली होती.या करीता मजूरांजवळील पैसे संपत असल्याने सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन गावी परत जाण्याचा निर्णय घेतला.लॉक डाऊन वाढले अशी भिती हि त्यांना वाटत असल्याने भिवंडीतील एका खाजगी पिकअप व्हॅन क्रं.एम एच 04 एच वाय 6640 हिने एकुण 23 जण भिवंडीहुन काल निघाले व नाशिक, मालेगाव, धुळे मार्गाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 मुंबई-आग्रा महामार्गावरील नरढाणा गावाजवळ बायपास रस्ता वर महामार्गावर निष्काळजीपणे उभा असलेला आयशर ट्रक क्रं.एम एच 18 ए ए 8117 च्या मागील बाजूस असलेले हुक हे जात असलेल्या पिक अप व्हॅन च्या पत्र्यात अडकून पत्रा कापला गेला व मोठा भिषण अपघात झाला.यात तीन जण गंभीर झाले.डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.अन्य जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून चक्कर बर्डी येथील हिरे मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

पिक अप व्हॅन नचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अपघात ग्रस्त दोन्ही वाहने पोलीसांनी ताब्यात घेतली आहे. मयतांची ओळख पटलेली आहे.1) कृष्णानंद गोवर्धन वय.61 उ.प्र.,2)साकीर उली नवाब आली वय.34.उ.प्र..,3) छोटुकट महोरोद्दीन वय.40.
,4)डाबु अरमान वय.54.उ.प्र.,5) शकील हनिफ अन्सारी वय.21.गंभिर जखमी झाले आहेत.व अन्य जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून उपचारार्थ चक्कर बर्डी येथील हिरे मेडिकल कॉलेज रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

अपघाताची वार्ता उत्तर प्रदेशातील नातेवाईक यांना कळाली.गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आयशर ट्रक चालक विरुद्ध अपघात बाबत नरढाणा पोलीस ठाण्यात युनूस अब्दुल अजीज अन्सारी यांनी लेखी तक्रार दाखल केली आहे.त्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

पुढील तपास नरढाणा पोलीस करत आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *