
यावल तालुक्यातील 3 डॉक्टरांचे स्वब तपासणीसाठी पाठवण्यात आले
यावल तालुक्यातील 3 डॉक्टरांचे स्वब तपासणीसाठी पाठवण्यात आले
यावल (तेज़ समाचार प्रतिनिधि) : तालुक्यात वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ यावल दिनांक 25 ता.प्र कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या यावल तालुक्यातील 3 डॉक्टरांचे स्वेब तपासणीसाठी पाठविण्यात आल्याने संपूर्ण यावल तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
यावल येथील 2 डॉक्टर व फैजपुर येथील 1 डॉक्टर व त्यांचा एक मदतनीस असे एकूण चार जणांचे स्वाब तपासणीसाठी जळगाव येथे आज दिनांक 25 रोजी पाठविण्यात आले, यावल येथील एक खाजगी डॉक्टर शासकीय सेवेत असणारा वैद्यकीय अधिकारी तसेच फैजपूर येथील एक डॉक्टर व त्याचा एक मदतनीस व्यक्ती हे कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्याने त्यांचे स्वेब वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घेऊन पुढील तपासणीसाठी जळगाव येथे पाठविल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.