
पुण्यात कोरोनाने पुन्हा घेतला तीन जणांचा बळी
पुणे (तेज समाचार डेस्क). पुणे शहरात कोरोनाचे संक्रमण हाथा बाहेर जात आहे. नवे रुग्ण मिळत आहे आणि उपचार घेत असलेल्या काही रुग्णांचा मृत्यु पर होत आहे. चांगली बातमी ही आहे कि अनेक रुग्ण बरे होऊन घरी पण गेले आहे. मंगळवारी पुण्यामध्ये तीन रुग्णांचा बळी कोरोना वायरस ने घेतला आहे. शहरातील ससून रुग्णालयात या तीघा रुग्णांनी आपला अखेरचा श्वास घेतला. तिघांचे वय हे साठ वर्षांपेक्षा अधिक होते. त्यापैकी दोघांना किडनी, मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होता. पुण्यातील मृतांची संख्या आता आठवर पोहोचली. अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.