शिरपूरमध्ये ३ दिवस संपूर्ण लॉकडाऊन

Featured धुळे
Share This:

शिरपूर (तेज समाचार डेस्क): शिरपूर वरवाडे नगरपरिषद क्षेत्रातील आमोदे, शिंगावे, मांडळ गावात ४५ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाली आहे. त्यामुळे संपूर्ण शिरपूर शहर, आमोदें, शिंगावे, मांडळ या गावांमध्ये दि. 23 ते 25 एप्रिल या तीन दिवसांच्या काळात संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे.

याकाळात शहरातील हॉस्पिटल व औषधांची दुकाने वगळता सर्व व्यवहार बंद राहतील. लॉकडाऊनच्या काळात कोणीही नागरिकाने कायद्याचे उल्लंघन केल्यास त्याच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि कलम 188 नुसार कडक कारवाई करण्यात येईल असे आदेश  प्रांताधिकारी डॉ. बांदल यांनी दिले आहेत.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *