
साई अभिषेक बसने 9 किलो गांजा सह 3 आरोपींना पोलिसांनी केले गजाआड
धुळे (तेज समाचार प्रतिनिधि) : मध्यप्रदेशातून लक्झरीबसने मुंबईतील चार प्रवासी अवैधरित्या पिवळसर रंगाचा 9 किलो गांजा घेऊन येताना नरढाणा पोलीसांनी ताब्यात घेतले.लक्झरी बस हि पकडली आहे. याबाबत मिळालेली माहिती की नरढाणा पोलिसांना एका खबरीने दिलेल्या माहितीनुसार नरडाणा पोलिसांनी पथक तयार करून मुंबई आग्रा महामार्गावर रेल्वे उड्डाणपुलावर वाहनांची तपासणी करण्यास सुरुवात केली असता इंदूरहून डोंबिवली कल्याण मुंबई येथील चार प्रवासी लक्झरी क्रमांक एम एच 18 / बी एस 3030 यातून प्रवास करत सेंधवा, शिरपूर मार्गाने महाराष्ट्र राज्यात दाखल झाले. पुढे नरढाणा मार्गाने धुळ्याकडे येत असतांना मुंबई-आग्रा महामार्ग राष्ट्रीय क्रमांक तीन रेल्वे गेट उड्डाणपूल वरती रस्त्यावर पोलिसांनी वाहन तपासणी सुरू केली असता. लक्झरी तिथे आली लक्झरी ची तपासणी करत असताना चार प्रवाशांच्या बॅक जवळून उग्र वास पोलिसांना आला पोलिसांनी त्या चार प्रवासी सह लक्झरी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणली व त्यांच्या बॅग ची तपासणी केली असता 76,872 रुपयांचा एकूण चार प्रवासी यांच्या बॅगेत थोडा ओलसर हिरवट पिवळसर रंगाची पाने बिया काळे उग्र वासाचा गांजा अमली पदार्थ त्याला पी 1 ते पी 4 असे पॅकिंग करून ठेवलेला असा एकूण 9,609 किंवा.ग्रॅम वजनाचे प्रतिकिलो 8,000 रुपयांचा माल सह
1) प्रवीण सुनील रातांबे.वय.25 रा.दत्त नगर वसाहत बिल्डिंग 3 माळा रुम नवं.302, टंडन रोड, डोंबिवली पूर्व,ता.कल्याण जिल्हा.ठाणे.
2) सिद्धार्थ गोरख साबळे.वय.23 लाल चकी,आय अप्पा मंदिराजवळ उल्हासनगर जिल्हा ठाणे.
3) ज्योती लक्ष्मण गायकर वय.23 रा.दत्त नगर वसाहत बिल्डिंग 3 माळा रुम नवं.302, टंडन रोड, डोंबिवली पूर्व,ता.कल्याण जिल्हा.ठाणे.
तिघांनाही नरडाणा पोलिसांनी अवैधरीत्या गांजा जवळ बाळगल्या प्रकरणी अटक करून गजाआड केले. यांच्या विरुध्द नरढाणा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. या अगोदरही लक्झरी वाहनातून अशाप्रकारे अवैधरित्या वाहतूक करताना पोलिसांनी लक्झरी गाडीलाही ताब्यात घेतले होते.
9 किलो ओलसर गांजा व तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लक्झरी बस लढा पोलीस स्थानकात उभी आहे. मध्यप्रदेशातून लक्झरी चालक-मालक असे अवैधरित्या नेहमीच वाहतूक करताना दिसून येतात अशी चर्चा नागरिक करीत आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.