तापी नदीकाठावर पिप्री गावाजवळ 27 ब्रास वाळू साठा जप्त

Featured जळगाव
Share This:

तापी नदीकाठावर पिप्री गावाजवळ 27 ब्रास वाळू साठा जप्त.

उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांची कारवाई.

यावल तहसीलदार यांच्यासह संबंधित सर्कल तलाठी निष्क्रिय असल्याचे उघड.

तालुक्यात गौण खनिज वाहतूक आणि उत्खननांमध्ये सुद्धा मोठा गैरप्रकार भ्रष्टाचार

यावल (सुरेश पाटील): तालुक्यातील तापी नदी काठावरील भालशिव पिप्री गावांच्या मध्ये अवैध वाळू साठा दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आणून ठेवलेला आहे अशी तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली होती त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील खनिकर्म अधिकारी दीपक चव्हाण व उप जिल्हाधिकारी रवींद्र भारदे व कुळ कायदा अतिरिक्त तहसीलदार माळी साहेब आणि त्यांचा पोलीस स्टॉफ टीमने दि.गुरुवार12ऑगस्ट 2021गुरुवार रोजी दुपारी अचानक भालशिव पिप्री या गावी वाळू साठा पडलेला आहे या ठिकाणी भेट दिली असता एका ठिकाणी14व दुसऱ्या ठिकाणी 11ब्रास अवैध वाळू साठा असा एकूण 25ब्रास वाळू साठा आढळून आल्याने जप्त करण्यात आला असून तो अवैध वाळू साठा पुढील कार्यवाहीसाठी पोलीस पाटील यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांना यावल तालुक्यात स्वतःयेऊन अवैध वाळू साठ्यावर कारवाई करावी लागली याचा अर्थ यावल तहसीलदार व संबंधित परिसरातील सर्कल तलाठी यांचे गौण खनिज वाहतूकीकडे आणि गौण खनिज उत्खननाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून कर्तव्यात कसूर केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
याबाबत या गावचे तलाठी व सर्कल यांना तहसीलदार महेश पवार यांनी कारवाईचा देखावा म्हणून नोटीस काढली असून आता नेमके तलाठी,सर्कल यांच्यावर काय? कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.
तापी नदी परिसरातून भालशिव,पिप्री,थोरगव्हाण,पथराडे,कोळन्हावी,डांभुर्णी,थोरगव्हाण मनवेल साकळी या गावच्या तापी नदीपात्रातून राजरोसपणे वाळूची अवैध तस्करी ट्रॅक्टर व डंपर वाहनाच्या माध्यमातून केली जाते या परिसरात वारंवार महसूल खात्याने याआधी जीवावर उदार होऊन दंडात्मक कारवाईही केली आहे मात्र भालशिव पिप्री या तापी नदी काठावरील गावामध्ये मोठ्या प्रमाणावर वाळू साठा करण्यात आला असून अवैधरित्या विक्रीसाठी हा काढल्याचे तक्रार जिल्‍हाधिकारी कार्यालयात करण्यात आल्याची समजते त्यानुसार खनिकर्म अधिकारी दीपक चव्हाण उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे साहेब यांनी या गावी अचानक भेट दिली त्या ठिकाणी त्यांना 13 ते 14 ब्रास एका ठिकाणी व दुसऱ्या ठिकाणी10ते11ब्रास वाळू साठा आढळून आला त्यानुसार खनिकर्म अधिकारी यांनी संबंधित तलाठी एम.ए.तायडे व सर्कल शेखर तडवी यांना घटनास्थळावर बोलावले त्या ठिकाणी पंचनामा करून पोलीस पाटील भालशिव सचिन तायडे यांच्या ताब्यात ही वाळू दिली असून असा अहवाल तहसीलदार यावल महेश पवार यांच्याकडे रात्री उशिरा तलाठी एम.ए.तायडे यांनी सादर केला आहे या संदर्भात यावल तहसीलदार आणि मंडळ अधिकारी शेखर तडवी यांनी मात्र प्रसिद्धीमाध्यमांना कोणतीही माहिती दिलेली नाही.
यावल तालुक्यात भालशिव पिप्री परिसरातून यावल शहरात व परिसरात ट्रॅक्टर व डंपरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर अवैद्य वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात होत असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत यावरून सिद्ध होते की या विभागात सर्कल,पोलीस पाटील हे नेमके काय कामकाज करतात?सर्कल हे मुख्यालया ठिकाणीच राहतात का? किंवा त्यांनी मुख्यालय हे फक्त कागदोपत्री दाखविलेले आहे का? कार्यालयीन वेळेत सरकले कार्यालयात उपस्थित असतात का? किंवा कार्यालयीन कामकाजाचा निमित्त कुठे बाहेर असतात का याची नोंद कार्यालयात फलकावर केलेली असते का ?असा प्रश्न उपस्थित होत असून आता तहसीलदार महेश पवार यांनी कारणे दाखवा नोटीस दिल्यानंतर संबंधितांवर संबंधितांवर प्रत्यक्षात काय कार्यवाही होते याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.
जळगाव जिल्हा खनिकर्म अधिकारी दीपक चव्हाण व उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांनी यावल तालुक्यातील तापी काठावर असलेल्या गौण खनिज उत्खननाच्या ठिकाणी स्टोन क्रशर चालकांच्या परिसरातील ठिकाणांची पाहणी करून किती प्रमाणात गौण खनिजाचे उत्खनन करण्यात आले त्या जागांचे मोजमाप करून तसेच गौण खनिज रॉयल्टी किती भरले गेली आहे याची चौकशी करून संबंधित काही स्टोन क्रशर चालकांवर कारवाई करावी अशी मागणी संपूर्ण तालुक्यातून होत आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *