RBIची मोठी कारवाई; महाराष्ट्रातील शिवम सहकारी बँकेचा परवाना रद्द

  कोल्हापूर (तेज समाचार डेस्क): शिवम सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. बँकेची आर्थिक स्थिती बिघडल्याने रिझर्व्ह बँकेनं ही कारवाई केल्याचं कळतंय. परवाना रद्द झाल्याने जिल्ह्यातील आणखी एका सहकारी बँकेचे अस्तित्व संपुष्टात आलंय. रिझर्व्ह बँकेनं शिवम बँकेवर आर्थिक निर्बंध लादले होते.  शिवम सहकारी बँकेकडे पुरेसे भांडवल नाही. तसेच भविष्यात भांडवल उत्पन्न करण्याचं कोणतंही साधन […]

Continue Reading

राहुल गांधीशी लग्न करायला निघाली इंदूरची महिला, एयरपोर्ट वर अडवल

  इंदूर (तेज समाचार डेस्क). मध्य प्रदेशच्या इंदूर शहरामध्ये एक विचित्र घटना घडली आहे. इंदूर विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एका महिलेने जोरदार गोंधळ घालत आपल्याला विमानतळावर प्रवेश देण्याची मागणी केली. मला दिल्लीला जाऊ द्या असं म्हणत विमानतळावर गोंधळ घातला आहे. विमानाचं कोणतंही तिकीट नसताना महिलेला विमानतळावर प्रवेश करायचा होता. सुरक्षारक्षकांनी या महिलेचं काहीही ऐकून न घेता […]

Continue Reading

सुशांतसिंग राजपूतच्या मावस भावावर फायरिंग

  सहरस (तेज समाचार डेस्क). अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मावस भाऊ राजकुमार सिंह आणि त्याच्या एका सहकाऱ्यांवर अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडल्या आहेत. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुशांत सिंह राजपूतचा मावस भाऊ राजकुमार सिंह आणि त्याच्या सहकाऱ्याला स्थानिक रुग्णालयात दाखल केलं आहे. सुशांत सिह राजपूतचा मावस भाऊ राजकुमार सिंह हा यामाहा मोटारसायकल शोरूमचा मालक आहे.

Continue Reading

धुळे : वीडीच्या थोटक्यावरून पोलिसांनी लावला चोरांचा छडा

  धुळे (तेज समाचार डेस्क).  धुळे जिल्ह्यामध्ये थैमान घालणाऱ्या घरफोडी टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. साक्री आणि शिंदखेडा तालुक्यातील दोन वेगवेगळ्या चोरीच्या घटनास्थळी आढळलेल्या बिडीच्या थोटकावरुन पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. साक्री तालुक्यातील सामोडे याठिकाणी एका घरामध्ये पहाटेच्या दरम्यान या चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवत घरातील एकूण आठ लाख 87 हजारांचा मुद्देमाल […]

Continue Reading

यावल : 32 ग्राम पंचायतीवर महिलांची सत्ता

यावल (सुरेश पाटील). तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या 63 गावांच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षणासाठी यावल तहसीलदार महेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात आले त्यात अयाज खान अयुब खान वय 13 वर्षे या मुलाच्या हस्ते काढण्यात आल्या. आरक्षणामुळे यात एकूण 32 ग्रामपंचायतींवर महिलांची सत्ता राहील यात अनुसूचित जाती साठी 8 जागा आरक्षित करण्यात आल्यात त्यात मनवेल,शिरसाळ, दहिगाव, […]

Continue Reading

नौकरी डॉट कॉम या वेबसाईटच्या माध्यमातून बेरोजगारांची फसवणूक, आरोपी पोलिस कोठडीत

जळगाव ( मराठी तेजसमाचार प्रतिनिधी ) नौकरी डॉट कॉम या ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून बेरोजगारांची फसवणूक करणा-या परप्रांतीय भामटा जळगाव सायबर पोलिसांच्या हाती लागला आहे. बेरोजगारांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करणा-या भामट्यास म्हसावद येथील . वरिष्ठ पोलिस अधिका-यांसह पो.नि. बळीराम हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली येथून पोलिस उप निरिक्षक अंगद नेमाने व त्यांच्या सहका-यांनी दिल्ली येथून ताब्यात घेतले […]

Continue Reading

प्रख्यात गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांना पद्मविभूषण

नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क).  देशातील सर्वोच्च सन्मानांपैकी एक मानल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची आज केंद्रीय गृहमंत्रालयाकडून घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये प्रख्यात गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. यासोबतच शिंजो आबे, डॉ. बेली मोनाप्पा हेगडे, नरिंदर सिंग कपानी, मौलाना वाहीदुद्दीन खान, बी. बी. लाल, सुदर्शन साहू यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. […]

Continue Reading

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मांडवे दिगर,ता.भुसावळ येथील मोतीमाता यात्रोत्सव रद्द

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मांडवे दिगर,ता.भुसावळ येथील मोतीमाता यात्रोत्सव रद्द यावल (सुरेश पाटील-): गारखेडा,ता.जामनेर येथून जवळच असलेल्या मांडवे दिगर,ता.भुसावळ येथील प्रसिद्ध व नवसाला पावणारी मोतीमाता देवीचा यात्रोत्सव दरवर्षाप्रमाणे पौष पौर्णिमेला यावर्षी देखील दि.२८ आणि २९’जानेवारी रोजी साजरा होणार होता.परंतु,कोरोना या जागतिक महामारीमुळे जगभरात कित्येक बांधव मृत्यूमुखी पडलेले आहेत आणि अजुनही गेल्या ११ महिन्यापासून या आजाराचा समूळ नायनाट […]

Continue Reading

पाणीपुरवठा योजनेत शिवसेनेच्या कामाचे श्रेय भाजपाचे जिल्हा परिषद सभापती रवींद्र उर्फ छोटू पाटील यांनी घेऊ नये

पाणीपुरवठा योजनेत शिवसेनेच्या कामाचे श्रेय भाजपाचे जिल्हा परिषद सभापती रवींद्र उर्फ छोटू पाटील यांनी घेऊ नये. शिवसेना उपजिल्हाप्रमुख तुषार उर्फ मुन्ना पाटील. यावल (सुरेश पाटील): यावल रावेर तालुक्यातील विविध 14 पाणीपुरवठा योजना या पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री मा.ना. गुलाबराव पाटील यांच्या आदेशान्वये तसेच चोपडा विधानसभा मतदार संघाच्या शिवसेना आमदार सौ. लताताई सोनवणे आणि माजी आमदार […]

Continue Reading

मलिंगाला आठवून जसप्रीत बुमराह झाला भावूक,

मुंबई (तेज समाचार डेस्क). भारतीय संघाने कांगारूंना पराभवाची धूळ चारून मालिका खिशात घालत ऐतिहासिक विजय मिळवला. सर्व संघातील खेळाडू आनंदी आहेत. मात्र भारतीय संघाचा हुकमी एक्का असलेला जसप्रीत बुमराह मात्र काहीसा दु:खी आहे. बुमराहने एक भावनिक ट्विट केलं आहे. इतक्या वर्षे तुझ्या साथीने क्रिकेटच्या मैदानावर खेळलो याचा मला अभिमान आहे. तुझी विचार करण्याची शैली तू […]

Continue Reading