2020 वर्ष निराशाजनक, घाबरु नका संकटाचा सामना करा- अक्षय कुमार
2020 वर्ष निराशाजनक, घाबरु नका संकटाचा सामना करा- अक्षय कुमार
मुंबई (तेज समाचार डेस्क): मुंबईकरांनो घाबरु नका, संकटाचा सामना करा, असं आवाहन अभिनेता अक्षय कुमारने केलं आहे. तसेच मुंबईकरांनी पालिका प्रशासनाच्या सूचनेचं पालन करावं अशी विनंतीही अक्षय कुमारने केली आहे. त्याने या संदर्भात एक व्हीडिओ पोस्ट केला आहे.
बईत सध्या पाऊस होत आहे. दरवर्षी सर्वजण याची प्रतिक्षा करत असतो. मात्र 2020 हे एक वेगळं वर्ष आहे. सुरुवातीपासून काही ना काही त्रास देत आहे. पावसाचाही आनंद नीट घेऊ देत नाही. रिमझिम पावसासोबतच चक्रीवादळही येत आहे. जर देवाची आपल्यावर कृपा झाली तर हे वादळ येणारही नाही किंवा या वादळाचा वेग असेल. पण जर हे वादळ मुंबईत आले तरी आपण मुंबईकर घाबरणारे नाही, असं अक्षय कुमारने म्हटलं आहे.
मुंबई पालिका प्रशासनाने काही महत्त्वाची पावलं उचलायला सुरुवात केली आहे. याची संपूर्ण यादी पालिकेने तयार केली आहे. आपल्याला फक्त त्याचे पालन करायचे आहे आणि आणखी एका संकटाचा सामना करु, असंही अक्षय कुमार म्हणाला.
दरम्यान, जर कोणतीही अडचण आली तर 1916 वर फोन करुन पालिकेची मदत घ्या. अफवांवर विश्वास ठेवा. तसेच घाबरुन जाऊ नका. संकटाचा सामना करा, असंही अक्षय कुमारने व्हीडिओमध्ये म्हटलं आहे.
The much-awaited Mumbai rains are here but this year we have an uninvited guest, #CycloneNisarga! In case it does hit us, here are some precautions shared by @mybmc, we will get through this as well. Praying for everyone’s well-being ?? pic.twitter.com/M1nlPUW4ua
— Akshay Kumar (@akshaykumar) June 2, 2020