जळगाव जिल्ह्याची हजारी कडे दृतगति ने वाटचाल, आज 36 नव्या रुग्णांची भर

Featured जळगाव
Share This:

जळगाव (तेज समाचार डेस्क). जिल्ह्यात आज नव्याने ३६ कोरोना बाधित रूग्ण आढळुन आले असुन रूग्ण संख्या ९०७ इतकी झाली आहे. तर जळगाव आणि भुसावळ या दोन्ही ठिकाणी २०० पेक्षा अधिक रूग्ण आढळुन आले असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली. आज नव्याने ३६ रूग्ण आढळुन आले असुन त्यात जळगाव शहर ७, भुसावळ ७, अमळनेर ४, भडगाव १, यावल १, एरंडोल २, जामनेर ३, जळगाव ग्रामीण १, रावेर ५, पारोळा ५ अशा रूग्णांचा समावेश आहे.

जळगावांत 206, तर भुसावळ मध्ये 205 रुग्ण संख्या

जिल्ह्यात आत्तापर्यंत जळगाव शहरात २०६ आणि भुसावळमध्ये २०५ अशी रूग्ण संख्या झाली असुन अमळनेरात १४३, चोपडा ४६, पाचोरा २८, भडगाव ७९, धरणगाव १८, यावल ३१, एरंडोल १७, जामनेर १७, जळगाव ग्रामीण २८, रावेर ५२, पारोळा १९, चाळीसगाव ८, मुक्ताईनगर ७ आणि दुसर्‍या जिल्ह्यातील ३ रूग्ण आहेत.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *