
शिरपुर तालुक्यातील भाविकांची गाडी दरीत कोसळून 2 जण जागीच ठार झाले, 9 जण जखमी
शिरपुर तालुक्यातील भाविकांची गाडी दरीत कोसळून 2 जण जागीच ठार झाले, 9 जण जखमी
धुळे (तेज समाचार प्रतिनिधि ): तोरणमाळ यात्रा करून परत येत असताना नागार्जून मंदिराच्या पुढे शिरपुर तालुक्यातील भाविकांची बोलेरो गाडी दरीत कोसळून दोन जण जागीच ठार झाले तर नऊ जण जखमी झाले. याबाबत पोलीस सुत्रानूसार माहीती अशी की,शिरपूर तालुक्यातील भावीक तोरणमाळ यात्रेसाठी आले होते.शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास परत येताना नागार्जून मंदिराच्या पुढे बोलेरो गाडी क्र.MH-41-V-4836 वळणावर खोल दरीत कोसळून दोन जण जागीच ठार झाले.यात तुळशीराम अलस्या पावरा(42) रा.खा-या दोंदवाडा,गुरूलाल सखाराम पावरा(35)रा.आंबा,ता.शिरपूर यांचा समावेश आहे तर वाहन चालक जितेश भिकला पावरा(36) याचेसह अनिताबाई फुलाला पावरा(29) सेंधवा,मेनकाबाई सुनिल पावरा(25)भडगाव सेंधवा,सुनिताबाई सुशिल पावरा(32)रोहीणी,सुनिल लालसिंग पावरा (19) सेंधवा,कवीता तुळशीराम पावरा(38)दोंदवाडा,सुंदरलाल गल्या पावरा (25)रोहीणी,राजेश सखाराम पावरा(10)आंबाखंबा,ऊमाबाई पवन पावरा (29)आंबाखंबा,पुजा तुळशीराम पावरा (14)दोंदवाडा,साक्षी गोविंदा पावरा(30) रोहीणी,काजल तुळशीराम पावरा(6)दोंदवाडा हे सर्व जखमी झाले आहे.यातील पाच जखमींना शिरपूर येथे खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले आहे. जखमींवर डाॅ गोविंद शेल्टे,डाॅ.सागर वसावे यांनी ऊपचार केले.प्रांताधिकारी शहादा डाॅ.चेतन गिरासे यांनी जखमींची भेट घेवून चौकशी केली.मदन पावरा यांनी सहकार्य केले. म्हसावद पोलीस स्टेशनचे फौजदार देविदास सोनवणे,पो.हे.काॅ.आसिफअली सय्यद,पोकाॅ.भाऊसाहेब गिरासे यांनी पंचनामा करून घटनेची नोंद म्हसावद पोलीसात केली. मयताचे शवविच्छेदन डाॅ.शेल्टे यांनी केले