
धुळे जिल्ह्यात 2 कोरोना बाधीत रूग्णांचा मृत्यू
धुळे जिल्ह्यात दोन कोरोना बाधीत रूग्णांचा मृत्यू
धुळे (तेज समाचार डेस्क): जिल्ह्यातील दोन कोरोना बाधीत रूग्णांचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला आहे. शिरपूर येथील ५८ वर्षीय पुरूष व वसमाणे ता. शिंदखेडा येथील २७ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ३० कोरोनाबाधीत रूग्णांचा मृत्यू झाला आहे. धुळे शहरातील १४ रूग्णांचा त्यात समावेश आहे. जिल्ह्यातील ३५४ रूग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे तर १६६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.