
धुळे: तालुका पोलीसांची कामगिरी लाखों रुपयांचा मुद्देमाल हस्तगत आरोपी गजाआड
धुळे: तालुका पोलीसांची कामगिरी लाखों रुपयांचा मुद्देमाल हस्तगत आरोपी गजाआड
धुळे (तेज समाचार प्रतिनिधि): तालुका पोलीसांची कामगिरी दोन मोटरसायकल, पिठाची गिरणी ,एक लाख रुपये रोख रक्कम असा लाखों रुपयांचा मुद्देमाल हस्तगत आरोपी गजाआड.
दोन हिरो होंडा मोटरसायकलसह पिठाची चक्की, एक लाखाची रोकड,एटीएम कार्ड आरोपींकडून असा माल जप्त करण्यात आला.
सटाणातील एका व्यक्तीसह दोन्ही आरोपी अल्पवयीन आहेत.आरोपींना अटक. तालुका पोलिसांनी कामगीरी.
फागणे गावातील सेवानिवृत्त शिक्षक यांचे बंद घराचा फायदा घेत आरोपीने घराचे दारचा कडी कोंडा तोडून 19/05/2020 रोजी घरात प्रवेश करून कपाटातील बँकेचे ए टी एम कार्ड चोरून नेऊन त्या कार्ड द्वारे चोरट्यांने 1,71,895 रूपयांचे साहित्य खरेदी केल्याची लेखी तक्रार नोंदवली होती.
तालुका पोलिसांनी तक्रारीच्या आधारे तपास करण्यास सुरुवात केली असता फागणे गावातून दोन संशयितांना ताब्यात घेतले अविनाश चुनीलाल पाटील व सुरज विजय बडगुजर दोघही राहणार फागणे.दोघांना चोवीस तासाच्या आत पोलीसांनी शोध घेत ताब्यात घेतले. त्यांच्याकडे माहिती जाणून घेण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. पोलिसी खाक्या दाखवला असता दोघांनी गुन्हा कबुल केला. त्यांनी चोरी केलेले पेटीएम व त्यांचे सहकारी संदीप रमेश दामू वय वर्ष 35.रा लखमापुर तालुका सटाणा जिल्हा नाशिक याने सदरचे एटीएम कार्ड द्वारे रोख रुपये काढून एटीएम कार्ड स्वॅप करून पिठाची गिरणी घर वापरायची खरेदी केल्याची कबुली दिली सदर गुन्ह्यात एक लाख रुपये रोख व अकरा हजार रुपये किमती पिठाची गिरणी काढून दिली संदीप रमेश धामणे यांचे मालक यांना उसंवर दिलेली रक्कम समाधान बोरसे यांनी 60 हजार रुपये पोस्ट येथे हजर केले सदर ताब्यात घेण्यात आले अविनाश चुनीलाल पाटील वय वर्ष 17 सुरज विजय बडगुजर वय वर्षे 17 दोन्ही राहणार फागणे यांच्याकडे चौकशी केली तेव्हा चोरीची कबुली दिली आहे त्यांनी दोन मोटर सायकल काढून दिल्या हिरो होंडा ड्रीम युगा कंपनीची दोन मोटरसायकल काढून गेली सदर आरोपींकडून 2 लाख 21 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल तालुका पोलिसांनी जप्त केला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित अप्पर पोलीस अधिकारी डॉक्टर राजू भुजबळ उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे ,पोकाँ राजेंद्र मोरे, पोना प्रवीण पाटील, पोकाँ भुषण पाटील, आदींनी गुन्हा उघडकीस आणला.