’15 दिवस धोक्याचे’; केंद्राकडून राज्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना

Featured मुंबई
Share This:

नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): कोरोनासंख्या आटोक्यात असली तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर आता मोदी सरकारने राज्य सरकारला सावध केलं आहे. याबाबत केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र दिलं आहे.

9 ऑगस्टपासून 15 ऑक्टोबरपर्यंत 15 दिवस धोक्याचे आहेत. हे 15 दिवस अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या दिवसात कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्यांनी दिले आहेत.

सणासुदीच्या काळात गर्दी जमा होणार नाही, याची काळजी राज्यांनी घ्यावी. कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन झालं पाहिजे. राज्यांनी स्थानिक स्तरांवर आवश्यक ते निर्बंध लागू करावेत. जेणेकरून गर्दी जमा होणार नाही. एक छोटीशी चूकही संसर्ग पसरण्याचं मोठं कारण ठरू शकते, असं केंद्र सरकारने म्हटलंय.

दरम्यान, ऑगस्ट महिन्यात सुरू झालेली कोरोना विषाणूची तिसरी लाट ऑक्टोबर महिन्यात अत्यंत भयंकर असू शकते. त्यामुळे यंदाही गणपती आणि दिवाळी कोरोना विषाणूच्या सावटाखाली असणार आहे, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *