गुजरातमधील कोविड सेंटरला आग, 12 लोकांचा होरपळून मृत्यू!

Featured देश
Share This:

गांधीनगर (तेज समाचार डेस्क):  गुजरातमधील भरुच येथील कोव्हिड केअर रुग्णालयाला भीषण आग लागली. या दुर्घटनेत 12 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहेत. ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. पटेल वेलफेअर रुग्णालयात रात्री जवळपास 12.30 वाजता ही दुर्घटना घडली. ही आग इतकी भीषण होती की संपूर्ण आयसीयू वॉर्ड यात जळून खाक झाला. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

भरुच जिल्ह्यातील पटेल रुग्णालयातील कोरोनाबाधितांसाठी कोव्हिड सेंटर सुरु करण्यात आलं आहे. या कोव्हिड सेंटरमधील आयसीयूमध्ये शॉटसर्किट झाल्याने आग लागल्याचं कळतंय. दुर्घटनेत आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक रुग्ण हे गंभीर जखमी झाले आहे.

अग्निशमन दलाच्या मदतीने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. जखमी झालेल्यांना सिविल, सेवाश्रम, जंबूसर अल मेहमूद रुग्णालयांसह इतर खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *