उद्या पासून 10वीं ची परीक्षा, 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी देणार परीक्षा

Featured महाराष्ट्र
Share This:

पर्यवेक्षकांसह केंद्र संचालकांना परीक्षा केंद्रावर मोबाईल बंदी

पुणे (तेज समाचार प्रतिनिधि) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी इयत्ता दहावीची परीक्षा आजपासून (ता.०३) सुरु होत आहे. यंदा राज्यभरातील २२ हजार ५८६ शाळांमधून १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. ही परीक्षा राज्यभरातील ४ हजार ९७९ केंद्रांवर घेण्यात येणार आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष डा. शकुंतला काळे यांनी सोमवारी पत्रकार परिषेदेत ही माहिती दिली.– 3 मार्चला पहिला आणि 23 मार्चला शेवटचा पेपर
राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ मंडळांमार्फत दहावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा ३ मार्च ते २३ मार्च या कालावधीत पार पडणार आहे.  या परीक्षेसाठी राज्यभरातून १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थ्यांची नोंदणी केलेली आहे. यामध्ये ९ लाख ७५ हजार ८९४ विद्यार्थी तर ७ लाख ८९ हजार ८९४ विद्यार्थिनी परीक्षा देणार आहेत. राज्यातील एकूण २२ हजार ५८६ माध्यमिक शाळांमधून या विद्यार्थांनी नोंदणी केली आहे.  परीक्षेमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी मंडळातर्फे २७३ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. त्याशिवाय प्रत्येक जिल्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. यंदा परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षकांसह केंद्रसंचालक यांना परीक्षा काळात मोबाईल वापरण्यास बंदी असणार आहे. पेपर व्हायरल होण्याच्या पार्श्वभूमीवर मंडळाने परीक्षा केंद्र चालकांना सक्त सूचना दिल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत अडचणी असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हेल्पलाइन सुरू केल्या आहेत.
-विभागीय मंडळनिहाय दूरध्वनी क्रमांक
पुणे ९४२३०४२६२७
नागपूर (०७१२) २५६५४०३, २५५३४०१
औरंगाबाद (०२४०) २३३४२२८, २३३४२८४, २३३१११६
मुंबई (०२२) २७८८१०७५,२७८९३७५६
कोल्हापूर (०२३१) २६९६१०१, १०२, १०३
अमरावती (०७२१) २६६२६०८
नाशिक (०२५३) २५९२१४१, १४३
लातूर (०२३८२) २५१६३३
कोकण (०२३५२) २२८४८०
राज्यमंडळ ०२०-२५७०५२७१, ०२०-२५७०५२७२
-विभागनिहाय विद्यार्थी संख्या
पुणे : २ लाख ८५ हजार ६४२
नागपूर : १ लाख ८४ हजार ७९५
औरंगाबाद : २ लाख १ हजार ५७२
मुंबई : ३ लाख ९१ हजार ९९१
कोल्हापूर : १ लाख ४३ हजार ५२४
अमरावती : १ लाख ८८ हजार ७४
नाशिक : २ लाख १६ हजार ३७५
लातूर : १ लाख १८ हजार २८८
कोकण : ३५ हजार ६३७
-पुणे विभागातील विद्यार्थी संख्या
पुणे : १ लाख ५९ हजार ९२८
अहमदनगर : ७६ हजार ९४
सोलापूर : ६९ हजार ६२०
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *