
10th 12th: ATKT परीक्षांबाबत वर्षा गायकवाड यांचा मोठा निर्णय!
10th 12th: ATKT परीक्षांबाबत वर्षा गायकवाड यांचा मोठा निर्णय!
मुंबई (तेज समाचार डेस्क): राज्यातील शिक्षण विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी एटीकेटीची परिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परिक्षा ऑक्टोबरमध्ये घेण्यात येते, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिलीये. शिक्षणमंत्र्यांच्या सांगण्यानुसार, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी एटीकेटीची परिक्षा पुढे निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या परिस्थितीचा एकंदरीत आढावा घेऊन यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल.मिळालेल्या माहितीनुसार, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची एटीकेटीची परिक्षा नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात घेण्यात येण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांपासून दहावी आणि बारावीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना फेरपरिक्षेची संधी देण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जात नाही.
यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिक्षांचा निकाल जुलैमध्ये लावण्यात आला. त्यामुळे फेरपरिक्षा घेण्यात आलेल्या नाहीत. यामुळे नापास झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष वाचवण्याची संधी मिळाली नाही.