तणावमुक्ती या विषयावरील ऑनलाईन ‘पत्रकार संवाद’ कार्यक्रमात ४ राज्यांतील १०३ पत्रकारांचा सहभाग !

Featured जळगाव
Share This:

तणावमुक्ती या विषयावरील ऑनलाईन ‘पत्रकार संवाद’ कार्यक्रमात ४ राज्यांतील १०३ पत्रकारांचा सहभाग !

साधनेने आत्मबळ जागृत करून नवीन भारताच्या निर्माणासाठी पत्रकारांनी योगदान द्यावे ! – श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था

यावल (तेज समाचार प्रतिनिधि): पत्रकारांचा थेट संबंध राष्ट्रजीवनाशी येत असल्याने समाज आणि राष्ट्र यांच्या दृष्टीने पत्रकारांचे दायित्व महत्त्वाचे मानले जाते. कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर समाजामध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या स्थितीत पत्रकारांनाही आर्थिक समस्या, मानसिक तणाव यांना सामोरे जावे लागत आहे. ईश्‍वराच्या स्मरणामुळे आत्मिक बळ जागृत होते आणि मन सकारात्मक होऊन तणावातून बाहेर पडता येते. लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाने साधनेने आत्मबळ जागृत करून नवीन भारताच्या निर्माणासाठी योगदान द्यावे, असे आवाहन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. चेतन राजहंस यांनी केले.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने २७ जून या दिवशी ‘सध्यस्थितीतील तणाव आणि उपाय’ या विषयावर पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन पत्रकार संवादा’त ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि छत्तीसगड राज्यातून १०३ पत्रकार-संपादक सहभागी झाले होते.

या विषयी मार्गदर्शन करतांना श्री. चेतन राजहंस म्हणाले की, अनुकूल परिस्थिती मन लगेच स्वीकारते; मात्र प्रतिकूल परिस्थिती त्वरित स्वीकारत नाही. परिस्थिती तणावयुक्त नसते, तर त्या व्यक्तीच्या गुण-दोषानुसार आपण ज्या प्रसंगाकडे कोणत्या दृष्टीने पहातो त्यावरून तणावाची परिस्थिती निर्माण होते. स्वयंसूचनेचा उपयोग करून या तणावाच्या परिस्थितीतून बाहेर येता येऊ शकते. आपल्या जीवनातील ताण-तणाव यांतून बाहेर येण्यासाठी प्रथम आपल्यातील स्वभावदोष कोणते आहेत, हे समजून घेणे आवाश्यक आहे. स्वभावदोषांमुळे शारिरीक आणि मानसिक रोगही निर्माण होतात. चिंता करण्याचा स्वभाव असेल, तर रक्तदाब, पित्त, निद्रानाश आदी शारिरीक, तर निराशा, व्यसन आदी मानसिक विकार उद्भवतात. स्वयंसूचना देऊन आपणाला या तणावातून बाहेर पडता येऊ शकते. स्वयंसूचनेसह नामजपा सारखे आध्यात्मिक उपाय केल्यास ईश्‍वराची कृपा आपल्यावर होते. संकटकाळात ईश्‍वराची कृपा महत्त्वाची आहे. ईश्‍वराच्या स्मरणाने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आपणाला संकटातून बाहेर पडता येते.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते श्री. अरविंद पानसरे यांनी या कार्यक्रमाची प्रस्तावना केली, तर सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या वेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्‍नांना हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे आणि सनातन संस्थेच्या डॉ. शिल्पा कोठावळे यांनी उत्तरे देऊन शंका निरसन केले.

आपला नम्र,

श्री. सुनील घनवट
महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती, संपर्क क्रमांक : ७०२०३ ८३२६४

Chaddha Classes

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *