गोलाणी मार्केटमध्ये भरदिवसा १० वर्षाच्या मुलीवर अत्याचार
जळगाव (तेज समाचार डेस्क) : शहरातील गोलाणी मार्केटच्या तिसर्या मजल्यावर शुक्रवारी दुपारी एका १० वर्षाच्या मुलीवर पाशवी अत्याचार केल्याची घटना घडली. हा प्रकार समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली असून पिडीत मुलगी आपल्या आजीसोबत भिक मागून उदरनिर्वाह करते. नराधामाने पळ काढला असून शहर पोलिसांकडून त्याचा शोध घेणे सुरु आहे.
गोलाणी मार्केटमध्ये शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास येथील हनुमान मंदिराच्या मागे पिडीत मुलगी उभी होती. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने तुला खायला देतो म्हणून तिला तिसर्या मजल्यावर नेले. तिसर्या मजल्यावरील एका स्वच्छता गृहात नेत त्याने तिच्यावर पाशवी अत्याचार केला. त्यानंतर त्याने तेथून पळ काढला. पिडीत मुलगी रक्ताने माखलेल्या कपडयांवर रडत रडत खाली आपल्या आजीकडे आली आणि सर्व हकीगत सांगितली. त्यानंतर आजीने पिडीत नातीला सोबत घेत शहर पोलीस स्थानक गाठले. पोलिसांनी तात्काळ गोलाणी मार्केट गाठले.
दरम्यान, पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षण अरूण निकम पिडीत मुलीकडून घटनास्थळाबाबत माहिती जाणून घेतली. पोलीस सीसीटीव्ही फुटेज मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकाराने बालिका प्रचंड भेदललेली असून तिला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे.