यावल शहरासह तालुक्यात वाळू तस्करी सुरूच आज 1 ट्रॅक्टर आणि 1डंपर पकडले. महसूलची कारवाई

Featured जळगाव
Share This:

यावल शहरासह तालुक्यात वाळू तस्करी सुरूच आज 1 ट्रॅक्टर आणि 1डंपर पकडले. महसूलची कारवाई.

जिल्हास्तरीय गौण खनिज पथक यावल तालुक्यात.

यावल (सुरेश पाटील):यावल शहरासह तालुक्यात अवैध अनाधिकृत वाळू वाहतूक सुरूच असल्याने आज सकाळी यावल महसूल पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर आणि 1डपंर पकडल्याने वाळू वाहतूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे,दरम्यान जळगाव येथील जिल्हास्तरीय गौणखनिज पथक सुद्धा यावल तालुक्यात दाखल झाले असल्याचे समजले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की भालशिव येथील अनधिकृत वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर आज 7/4/2021 बुधवार रोजी नायब तहसीलदार आर.डी.पाटील, नायब तहसीलदार आर.के.पवार,वाहन चालक सावळे यांनी कारवाई करून यावल पोलिस स्टेशन मधे ट्रॅक्टर जमा करून पुढील कारवाई सुरू केली आहे
त्याच प्रमाणे काल दि. ६/४/२०२१ रोजी बामणोद भाग व किनगाव भाग मंडळ अधिकारी व सर्व तलाठी यांनी संयुक्तरीत्या अवैध वाळू वाहतूक करणारे एक डंपर पकडून फैजपूर पोलीस स्टेशन येथे लावून पंचनामा करण्यात केला. यावरून तालुक्यात अवैध गौण खनिज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने आस जळगाव येथील जिल्हास्तरीय गौणखनिज पथक सुद्धा यावल तालुक्यात येऊन प्रत्यक्ष घटनास्थळी भेटी देऊन चौकशी व कार्यवाही सुरू केल्याचे समजले. अवैध वाळू व अवैध गौण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर डंपर इत्यादी वाहन तालुक्यात ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत त्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये हे अवैध गौण खनिज वाहतूक करणारे वाहन संबंधित अधिकाऱ्यांना दिसून येत नाही का? किंवा यात मोठे आर्थिक व्यवहार होता आहेत का तालुक्यातील किती मंडळ अधिकारी व तलाठी हे आपल्या मुख्यालयाच्या ठिकाणी राहात नसून त्यांच्या कार्यक्षेत्रातून अवैध वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर व डंपर अवैध वाळू वाहतूक करतात कशी? हा मोठा प्रश्न उपस्थित केला जात असून फैजपुर भाग प्रांताधिकारी,यावल तहसीलदार,पोलीस निरीक्षक यावल यांनी ठोस नियोजन करून कडक कारवाई करावी असे संपूर्ण यावल शहरासह तालुक्यात बोलले जात आहे.
जिल्हास्तरीय गौण खनिज पथकाने आज दिनांक 7 रोजी यावल तालुक्यात कुठे आणि केव्हा काय कारवाई केली? याबाबत माहिती मिळालेली नसली तरी अवैध वाळू वाहतूक दारामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *