1 killed, 1 seriously injured in truck-motorcycle accident on Yaval Bhusawal road

यावल भुसावळ मार्गावर वाघळुद फाट्यावर ट्रक व मोटरसायकल अपघातात 1जागीच ठार,1 गंभीर जखमी

Featured जळगाव
Share This:

यावल भुसावळ मार्गावर वाघळुद फाट्यावर ट्रक व मोटरसायकल अपघातात 1जागीच ठार,1 गंभीर जखमी

यावल (सुरेश पाटील): तालुक्यातील यावल भुसावळ मार्गावरील वाघळुद फाट्यावर मोटरसायकल अपघातात एकाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.या संदर्भात मिळालेली माहीती अशी की दिनांक२१एप्रिल रोजी दुपारी वाजेच्या सुमारास कडुन येणाऱ्या मोटरसायकल दुचाकी वाहनाने सुरेश सोनवणे वय ४५वर्ष राहणार आव्हाणे ता.जि.जळगाव व त्यांची मुलगी मनिषा सुरेश सोनवणे वय१९ वर्ष हे दोघ यावल कडुन बोरावल मार्गे जळगावकडे जात असतांना भुसावळकडुन यावल कडे येणाऱ्या ट्रक क्र.जि.जे.27 टी.टी.4378या चारचाकी मोटर वाहनाने धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघात सुरेश सोनवणे हे जागीच मरण पावले असुन त्यांची मुलगी मनिषा सोनवणे ही गंभीर जखमी झाली असून त्याच वेळी अंजाळे येथील राहणारे धनराज शांताराम सपकाळे व सागर निवृती तायडे यांनी घटनास्थळी गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या तरूणीची तात्काळ मदत करून ग्रामीण रुग्णालयात पहोचवले तिचे यावलच्या ग्रामीण रुग्णालयात औषधपचार करण्यात येवुन तिला पुढील उपचारासाठी जळगाव येथे पाठवण्यात आले आहे.

मयत सुरेश सपकाळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला घटनेचे वृत कळताच यावल पोस्टेचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली फौजदार अजमल पठाण ,विनोद खांडबहले,होमगार्ड पंकज फिरके यांनी घटनास्थळ गाठले व पंचनामा करून अपघातग्रस्त ट्रकताब्यात घेतला आहे.सदर घटनेबाबत यावल पोलीसात आपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *