
धुळे शहरात 1 करोना पॉझिटिव्ह आढळला
धुळे (तेज समाचार प्रतिनिधि): धुळे शहरातील तिरंगा चौक परिसरात एका व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शनिवारी हिरे महाविद्यालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाचे घशाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आला असून तो पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर आता धुळे शहरात करोना रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. दरम्यान मनपा प्रशासनाकडून गेल्या काही दिवसात विविध उपोययोजना करण्यात आल्या आहे. रुग्ण राहत असलेला परिसर सील करण्याचे काम प्रशासनाकडून सुरु आहे. धुळ्यातील हिरे महाविद्यालयात साक्रीतील करोना बाधितांचा मृत्यू झाला होता तसेच मालेगाव एका महिलेवर धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु होते़ तिचाही मृत्यू झाला आहे.