शहाद्यात 1 कोरोनाचा रुग्ण आढळला

Featured नंदुरबार
Share This:

 शहादा (तेज समाचार डेस्क): शहादा येथील २३ वर्षीय युवकाच्या कोविड_१९ चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. नवीन बाधित रूग्ण आधी सापडलेल्या बाधित रूग्णाच्या संपर्कात आला होता अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिली.  नंदुरबार शहादा येथील २३ वर्षीय युवकाच्या कोविड१९ चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. हा युवक त्याच प्रतिबंधीत क्षेत्रातील असून कोविड -१९ च्या संसर्गामुळे मृत्यू पावलेल्या युवकाच्या संपर्कात आला होता. बाधित रूग्णावर उपचार सुरू असून नंदुरबार जिल्ह्यातील करोना रूग्ण संख्या ८ वर पोहचली असून त्यात एकाचा मृत्यू झाला आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *